Crime News Saam TV
देश विदेश

Crime News: थरारक! आधी महिलेची हत्या केली मग काळीज शिजवून खाल्लं

आरोपीला यासाठी त्याला अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Crime News: अमेरिकेतील एका हत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने एका महिलेची क्रुरपणे हत्या करुन तिचं काळीज शिजवून खाल्ल्याची थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यात ही घटना घडली आहे. लॉरेन्स पॉल अँडरसन असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. (Crime News)

पॉल अँडरसनने एका चार वर्षाच्या मुलासह तिघांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. द इंडिपेंडंटच्या माहितीनुसार, आरोपीने हे सर्व खून 2021 मध्ये केले. यासाठी त्याला अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Latest Marathi News)

दुसऱ्या प्रकरणात, तो 2021 मध्ये तुरुंगातून सुटला आणि सुटका झाल्यानंतर महिनाभरातच कमी कालावधीत त्याने हे तीन खून केले. तुरुंगातून सुटल्यानंतर काही आठवड्यांनंतर त्याने अँड्रिया ब्लँकेनशिपची हत्या केली आणि नंतर तिचं काळीज बाहेर काढले.

त्यानंतर तो मावशीच्या घरी गेला आणि तिथे बटाटे घालून ते काळीज शिवजून खाल्ल्याची माहिती आहे. एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, त्यानंतर त्याने 67 वर्षीय लिओन आणि तिची 4 वर्षांची नात केओस येट्स यांचीही हत्या केली. हत्येपूर्वी त्याने तयार केलेलं अन्न खायला देण्याचा प्रयत्नही केला होता.

अँडरसनला अंमली पदार्थांच्या प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा झाली होती. त्यापैकी त्याने फक्त तीन वर्षांची शिक्षा भोगली होती. त्याला ओक्लाहोमाचे गव्हर्नर केविन स्टिट यांनी शिक्षा दिली. त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याच्या तपासादरम्यान अँडरसनला चुकून शिक्षेच्या यादीत टाकण्यात आल्याचे आढळून आले. आता अँडरसनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT