Crime News Saam tv
देश विदेश

Crime News : बापरे! ऑनलाइन मीटिंगमध्ये अचानक सुरू झाला आक्षेपार्ह व्हिडिओ, कंपनीचे सर्वच कर्मचारी हादरले

Meeting Hack : यामध्ये मीटिंग सुरू असताना अचानक स्क्रीनवर अश्लील व्हिडिओ सुरू झाला.

साम टिव्ही ब्युरो

Crime News : काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पब्लिक प्लेसमध्ये अचानक आक्षेपार्ह व्हिडिओ सुरू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये रेल्वे स्थानकावर तसेच विधानसभेत अचानक अश्लील व्हिडिओ सुरू झाल्याच्या घटना ताज्या असतानाच आता एका मीटिंगमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. यामध्ये मीटिंग सुरू असताना अचानक स्क्रीनवर अश्लील व्हिडिओ सुरू झाला. (Zoom Meeting)

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील एका कंपनीमध्ये ही घटना घडली आहे. येथे सुरू असलेल्या मीटिंगवेळी अचानक अश्लील व्हिडिओ स्क्रीनवर दिसू लागला. व्हिडिओ सुरु होताच सर्वांना आपल्या माना खाली कराव्या लागल्या. स्क्रीनवर अचानक असे दृष्य दिसत असल्याने नेमके काय घडत आहे हे कुणालाच काहीच समजत नव्हते.

होस्टने हा व्हिडिओ लावला आहे का? व्हिडिओ का सुरू केलाय? कोणी हा व्हिडिओ बंद का करत नाही असे अनेक प्रश्न येथील व्यक्तींच्या मनात उपस्थित होते. मात्र होस्टने प्रयत्न करुनही तो व्हिडिओ बंद होत नव्हता. त्यामुळे त्यांनी शेवटी ही मीटिंग बंद केली. त्यानंतर दुसरी लिंक सर्वांना देण्यात आली. त्यावर पुन्हा मीटिंग घेण्यात आली.

मीटिंग झाली होती हॅक

दुसरी मीटिंग सुरू झाल्यानंतर होस्टने सदर घटनेचे स्पष्टीकरण दिले. यात त्यांनी म्हटलं की, आपली आधीच्या लींकवर सुरू असलेली मीटिंग हॅक झाली होती. त्यामुळे तिकडूनच थेट अशा प्रकारचा अश्लील व्हिडिओ समोर आला. मीटिंग हॅक झाल्याने मला काहीच करता येत नव्हते, असे होस्टने सांगितले. तसेच मीटिंगमधील सर्व व्यक्तींची माफी मागितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT