Girlfriend-Boyfriend Clash Saam TV
देश विदेश

Shocking News : प्रेम माझ्याशी अन् लग्न दुसरीशी, प्रेयसी संतापली; प्रियकराच्या पत्नीचा गळाच चिरला

Girlfriend-Boyfriend Clash : प्रियकराचे लग्न झाल्याचे कळताच प्रेयसी संतापली. तिने रागाच्या भरात त्याचं घर गाठलं. तिथे बेडरुममध्ये असलेल्या नववधूवर चाकूने सपासप वार केले.

Satish Daud

प्रियकराचे लग्न झाल्याचे कळताच प्रेयसी संतापली. तिने रागाच्या भरात त्याचं घर गाठलं. तिथे बेडरुममध्ये असलेल्या नववधूवर चाकूने सपासप वार केले. या घटनेत नववधू गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एखाद्या सिनेमाच्या कथेलाही लाजवेल, अशा हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात घडलाय.

याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपी तरुणीवर गुन्हा दाखल केला असून तिच्या प्रियकराला देखील ताब्यात घेतलं आहे. रोशन असं गंभीर जखमी झालेल्या नववधूचे नाव असून प्रिया असं अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रिया आणि बबलू यांचे एकमेकांवर प्रेम होते. गेल्या 3 वर्षांपासून दोघेही रिलेशनशिपमध्ये (Love relationship) राहत होते. बबलू याने प्रियाला लग्नाचे वचनही दिले. मात्र, ऐनवेळी त्याने रोशन या तरुणीसोबत विवाह केला.

बबलूचा विवाह झाल्याचं कळताच प्रियाचा माथा ठणकला. तिने रागाच्या भरात किचनमधून चाकू घेऊन बबलूचे घर गाठले. तिथे उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींसोबत प्रियाने वाद घातला. इतकंच नाही, तर बबलूच्या बेडरुममध्ये घुसून तिने नववधू रोशन हिच्यावर चाकूने सपासप (Crime) वार केले.

जो माझ्या आणि बबलूच्यामध्ये येईल, त्याला मी खल्लास करणार, असं म्हणत प्रियाने नववधू रोशनचा चाकूने गळाच चिरला. या घटनेत रोशन गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रिया आणि बबलूला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT