Nirmala Sitaraman Union Budget 2022 Saam Tv
देश विदेश

Budget 2022: येत्या पाच वर्षात तरुणांसाठी 60 लाख नोकऱ्यांची निर्मिती करणार - निर्मला सीतारामन

लवकरच LIC चा IPO आणणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. पुढच्या पाच वर्षात 60 लाख नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही अर्थमंत्र्यांनी दिला आहे. तसंच एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार असल्याचं त्यांनी म्हटल

वृत्तसंस्था

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सावरत आहे. GDP 9.2 टक्के राहण्याचा अंदाज अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी व्यक्त केला आहे. लवकरच LIC चा IPO आणणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. पुढच्या पाच वर्षात 60 लाख नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही अर्थमंत्र्यांनी दिला आहे. तसंच एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार असल्याचं त्यांनी म्हटल.

हे देखील पहा -

अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळेल याची उत्सुकता सर्वसामान्य जनता, शेतकरी ते उद्योग विश्वाला अनेक दिवसांपासून लागून आहे. काल भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित केले होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प असून केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांचा अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प आहे. कोरोनाचं (Corona) संकट दोन वर्षांपासून ओढावलं असून अशा परिस्थितीत देशासह जागतिक अर्थव्यवस्थेसमोर यातून सावरण्याचे आव्हान आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या क्षेत्राला दिलासा देणं आणि रोजगार निर्मिती करण्याचं आव्हानं केंद्र सरकारपुढे असणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय; गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

Leopard Attack : बिबट्यानं आधी हल्ला केला, मग फरफटत नेलं, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनं हळहळ

SCROLL FOR NEXT