School Saam Tv
देश विदेश

१०० विद्यार्थी, ११ कर्मचारी काेविड बाधित; आठवड्याची सुटी जाहीर

संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तीन किंवा अधिक कोविड-१९ ची रुग्ण संख्या आल्यास संबंधित क्षेत्र क्लस्टर म्हणून वर्गीकृत केले जाईल असे स्पष्ट केले आहे.

साम न्यूज नेटवर्क

कर्नाटक (basavaraj bommai latest news) : कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. सध्या बहुतांश राज्यात शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरु झाली आहेत. काेविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विद्यार्थी शाळांत जाऊ लागले आहेत. दरम्यान कर्नाटक (karnataka) राज्यातील एका शाळेमधील शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची (coronavirus) झाल्याचे निदान झाले आणि व्यवस्थापनासह प्रशासकीय अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. karnataka covid cases rises at residential school chikmagalur

कर्नाटकातील चिकमंगळूर (chikkamagalur) येथील जवाहर नवोदय विद्यालय या निवासी शाळेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र नुकतेच स्पष्ट झाले. या विद्यालयातील एकूण १०१ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याबाबत येथील व्यवस्थापनाने दुजाराे दिला आहे. तसेच शाळा एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले.

या शाळेतील ११ कर्मचा-यांना देखील काेराेनाची लागण झाली आहे. विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गावर वैद्यकीय पथकाची करडी नजर आहे. दरम्यान काेविड बाधितांना ओमिक्रॉनचा (omicron) संसर्ग झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी नुमने (genome sequencing) पाठविण्यात आले आहेत. संक्रमित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत अशी माहिती चिकमंगळूरचे जिल्हा आराेग्य अधिका-यांनी दिली आहे.

दरम्यान रविवारी कर्नाटकातील शिवमोग्गा येथील एका खाजगी नर्सिंग स्कूलमध्ये २९ विद्यार्थ्यांना काेराेनाची लागण झाल्याचे आढळून आले हाेते. संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavaraj bommai) यांनी तीन किंवा अधिक कोविड-१९ ची रुग्ण संख्या आल्यास संबंधित क्षेत्र क्लस्टर म्हणून वर्गीकृत केले जाईल असे स्पष्ट केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT