Court News  Saam Digital
देश विदेश

Court News : CJI डीवाय चंद्रचूड यांच्याकडून वकिलांना खास गिफ्ट; केस संदर्भातील माहिती व्हॉट्सअॅपवर मिळणार

Supreme Court/CJI D. Y. Chandrachud : सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड वकिलांना एक खास गिफ्ट दिलं आहे. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान सेवांच्या वापरासंदर्भात व्हाट्सअॅप सेवा सुरू करण्याची घोषणा केली.

Sandeep Gawade

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी वकिलांना एक खास गिफ्ट दिलं आहे. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान सेवांच्या मदतीने व्हाट्सअॅप सेवा सुरू करण्याची घोषणा केली. त्यामुळे खटला दाखल करण्यापासूनची इतर सर्व माहिती प्रकरणाची तारीख, मेंशनिग वकिलांना त्यांच्या व्हाट्सअॅपवर मिळणार आहे.

नव्या सेवेची घोषणा करताना सीजेआय म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या ७५ वर्षात न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी नवी संपल्पना सुरू केली आहे. आता व्हॉट्सअॅप ला आयसीटी सेवासोबत जोडलं जात आहे. यावर वकिलांच्या केसेस कोर्टात दाखल होणारी माहिती त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअॅपवर उपलब्ध होईल. त्याचसोबत बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांना कॉजलिस्ट प्रकाशित झाल्याची सूचना मिळणारआहे.

यामुळे न्यायपालिकेच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदलाव होईल आणि कागदाचा उपयोगही कमी होईल. विशेष म्हणजे जास्तीत जास्त वकिलांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचता येणार आहे. याचा महत्त्वपूर्ण फायदा असा होईल की दर्गमभागातील लोकांपर्यंत न्यायालयासंदर्भातील माहिती मिळू शकणार आहे.

बनवण्यात आला आहे. त्या बनवण्यात आलेल्या न्यायालयाच्या सर्व सेवांना मेघराज क्लाउड २.० मध्ये ट्रान्सफर करण्यात येत आहे, जो नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरद्वारे (NIC) बनवलेला क्लाउड इन्फ्रा आहे. तसंच सर्वोच्च न्यायालय आणि ई-कोर्ट प्रणालीलाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे सर्व न्यायालये ऑनलाईन होणार आहेत. सुरुवातीला अडचणी होत्या मात्र आता भातातच सर्व्हरवर डेटा सुरक्षित ठेवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Maharashtra News Live Update: CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल; तातडीच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT