Couple Caught in Mall Washroom Controversy Saam Tv News
देश विदेश

गर्लफ्रेंड मॉलच्या वॉशरूमला गेली, नंतर बॉयफ्रेंडही गेला, अश्लील चाळे करताना दोघांना रंगेहाथ पकडलं

Couple Accused of Obscene Act: मुझफ्फरपूर मॉलमध्ये प्रेमीयुगुलावर अश्लील कृत्याचा आरोप. मॉल कर्मचाऱ्यांनी दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. चौकशीनंतर पोलिसांनी दोघांना सोडलं.

Bhagyashree Kamble

  • मुझफ्फरपूर मॉलमध्ये प्रेमीयुगुलावर अश्लील कृत्याचा आरोप

  • मॉल कर्मचाऱ्यांनी दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केलं

  • चौकशीनंतर पोलिसांनी दोघांना सोडलं

  • जोडप्याने खोटे आरोप लावल्याचा दावा केला

कपलचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. कधीकधी प्रेमीयुगुल आपले भान हरपतात. यामुळे कधीकधी प्रेमीयुगुल अडचणीत सापडतात. असाच प्रकार बिहारमधील मुझफ्फरपूर येथे घडला. मोतीझील भागातील एका मॉलमध्ये जोडपं फिरायला गेलं होतं. यादरम्यान, दोघांना अश्लील कृत्य करताना पकडण्यात आलं. कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

मोतीझील भागातील एका मॉलमधून हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. एक जोडपं मॉलमध्ये फिरायला गेले होते. यादरम्यान, फिरत असताना प्रेयसीच्या अचानक पोटात दुखायला लागतं. ती थेट वॉशरूममध्ये जाते. तिच्या मागोमाग प्रियकरही महिलांच्या वॉशरूममध्ये जातो. याचवेळी मॉलमधील काही कर्मचाऱ्यांनी दोघांना एकत्र पाहिलं.

कर्मचाऱ्यांचा असा आरोप आहे की, दोघेही अश्लील कृत्य करीत होते. कर्मचाऱ्यांनी प्रियकराला पकडून बाहेर काढलं आणि पोलिसांना कळवलं. शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी शरत कुमार यांच्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनीही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आलं. त्यांच्या कुटुंबीयांना देखील बोलावण्यात आलं.

यावेळी पोलिसांनी दोघांना सज्जड दमही दिला. प्रेयसीनं पोलिसांना सांगितलं की, 'पोटात दुखत होतं म्हणून वॉशरूमला गेली. त्यामुळे प्रियकरही मदतीसाठी आत आला. कर्मचाऱ्यांनी आमच्यावर खोटा आरोप केला आहे', असं प्रेयसीनं सांगितलं. दोघे एकमेकांना आठ वर्षांपासून ओळखतात आणि एकाच गावातील रहिवासी आहेत, अशी माहिती चौकशीतून समोर आली.

दरम्यान, मॉल कर्मचाऱ्यांनी मात्र पोलिसांना सांगितलं की, जोडपं वॉशरूममध्ये अश्लील कृत्य करत होतं आणि विचारणा करताच प्रियकर त्यांच्याशी भांडला. त्यामुळेच हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Face Cream: घरच्या घरी बनवा बीटरूट फेस क्रिम, आठवडाभरात चेहऱ्यावर दिसेल गुलाबी चमक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Vitamins: वेळीच व्हा सावध! व्हिटॅमिन्सच्या गोळ्या रोज घेणं ठरेल घातक; डॉक्टरांनी सांगितल्या 'या' मर्यादा, आताच घ्या जाणून

MHADA Lottery: खुशखबर! म्हाडाची २००० घरांची लॉटरी! कल्याण-ठाण्यात मिळणार हक्काचे घर; या दिवशी करता येणार अर्ज

Hrithik Roshan Birthday : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत स्टार किडची संपत्ती किती? जगतोय लग्जरी लाइफस्टाइल

SCROLL FOR NEXT