Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : प्रेमी युगुलाचं भान हरपलं; दोघांचा रस्त्यावरच खुल्लम खुल्ला रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालेला व्हिडिओ जयपूरमधील जवाहर सर्कल स्क्वेअरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : राजस्थानमध्ये बाईकवर बसलेल्या प्रेमी युगुलांच्या रोमान्सचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. तरुणी बाईकवर पेट्रोल टाकीवर बसलेली असून तरुण बाईक चालवत आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमधील हा व्हिडीओ असल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ होळीच्या दिवशीचा आहे, कारण तरुण-तरुणी दोघेही रंगाने माखलेले दिसत आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ जयपूरमधील जवाहर सर्कल स्क्वेअरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये एक प्रेमी युगल बुलेटवरुन जाताना दिसत आहे. ही तरुणी पेट्रोल टाकीवर बसून बाईक चालवणाऱ्या तरुणाला मिठी मारत आहे. दोघांनी हेल्मेट देखील घातलेले नाही. (Latest News Update)

खुलेआम वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या जोडप्याचा व्हिडीओ लोकांनी शूट केला आहे. राजस्थानच्या वाहतूक पोलिसांपर्यंतही हा व्हिडीओ पोहोचला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी या जोडप्याची चौकशी सुरू केली आहे. दुचाकीच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी अजमेर जिल्ह्यातील एका प्रेमी युगुलाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शहरातील पुष्कर रोडवर एक तरुण आणि एक तरुणी बाईकवर खुलेआम रोमँटिक स्टंट करताना दिसले होते. त्यातही तरुण बाईक चालवत होता आणि तरुणी त्या तरुणाकडे तोंड करून पेट्रोल टाकीवर बसली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT