चिंता वाढली; देशात गेल्या 24 तासांत दीड लाख नवे ओमिक्रॉन रुग्ण... Saam Tv
देश विदेश

चिंता वाढली; देशात गेल्या 24 तासांत दीड लाख नवे ओमिक्रॉन रुग्ण...

देशात १ लाख ५९ हजार ४२४ नवे रुग्ण आढळले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : भारतामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाली आहे. देशात नव्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या गेल्या २४ तासामध्ये दीड लाखांपेक्षा सर्वाधिक आहे. शनिवारी दिवसभरामध्ये देशात १ लाख ५९ हजार ४२४ नवे रुग्ण (Patient) आढळले आहेत. तर ४० हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शनिवारी दिवसभरामध्ये देशात १ लाख ५९ हजार ६३२ कोरोनाचे रुग्ण आढळले, तर ४० हजार ८६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

हे देखील पहा-

मागील २४ तासामध्ये कोरोनामुळे ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हीटी (Positivity) रेट वाढत असल्याने तो १०.२१ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. सध्या देशामध्ये ५ लाख ९० हजार ६११ जण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ओमिक्रॉन (Omicron) बाधितांचा आकडा ही आता चिंता वाढवणारी आहे. भारतात २७ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३ हजार ६२३ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १४०९ जण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry Health) दिली आहे. महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) सर्वाधिक ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद असून तो आकडा १ हजाराच्या वर येऊन पोहोचला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीमध्ये (Delhi) पाचशेपेक्षा जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण नोंद झाले आहेत. देशात सर्वाधिक महाराष्ट्रात ४१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. दिल्लीत २० हजार तर बंगालमध्ये १८ हजार रुग्ण शनिवारी आढळले आहेत.

देशातील १० राज्यामध्ये १ लाख २६ हजार नव्या रुग्णांची नोंद शनिवारी दिवसभरात झाली आहे. शुक्रवारी देशामध्ये १ लाख ४१ हजार ९८६ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर त्याअगोदर गुरुवारी १ लाख १७ हजार १०० रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत देशामध्ये एकूण ३ कोटी ५५ लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ कोटी ४४ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या ५ लाख ८३ हजारांपेक्षा जास्त आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

SCROLL FOR NEXT