Corona Latest News Update Saam Tv
देश विदेश

काळजी घ्या! देशात २४ तासांत ८ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद; १० मृत्यू

देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या (corona new patients) सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 8,329 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 40,370 झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे शुक्रवारी आढळून आलेल्या नवीन प्रकरणांची संख्या गुरूवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत 9.8 टक्के अधिक आहे. दैनिक सकारात्मकता दर 2.41 टक्के आहे. भारतात एकूण केस लोड 4,32,13,435 आहे. (Corona Virus Latest Update in India)

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार गेल्या 24 तासांत 4 हजार 216 लोकं कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती. मात्र गेल्या बुधवारी देशात एकाच दिवशी पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढतच गेली. दरम्यान, नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 42 लाखांवर पोहचला आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 24 हजार 747 आहे.

दुसरीकडे, देशासह महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 3 हजार 81 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. केवळ मुंबईतच 1 हजार 956 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या अगोदर मंगळवारी मुंबईत 1 हजार 242 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी आढळलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ही रुग्णसंख्या अधिक आहे.

Edited By - Satish Daud

दरम्यान, भारतात कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर 98.69% इतका आहे. देशात गेल्या 24 तासांत एकूण 4,216 रुग्ण बरे झाले आहेत. यासह कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या पराभूत करणाऱ्यांची एकूण संख्या 4,26,48,308 झाली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक 1323 लोक बरे झाले, त्यानंतर केरळमध्ये 1301, दिल्लीत 419 आणि हरियाणा-महाराष्ट्रात 228-228 लोक बरे झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर विरोधात ढाणकी शहर कडकडीत बंद

किडनी स्टोनच्या रुग्णांनी काय खावे आणि काय काय खाऊ नये?|Kidney Stone Diet Tips

Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Kaju Katli Recipe: खास कार्यक्रम किंवा सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट काजू कतली; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT