कोरोना लढ्याला बळकटी!; DCGI कडून हेटरोच्या औषधाला मान्यता Saam Tv
देश विदेश

कोरोना लढ्याला बळकटी!; DCGI कडून हेटरोच्या औषधाला मान्यता

कोरोनाच्या लढ्यात आता आणखी एक पाऊल भारताने टाकलं असून डीसीजीआयने कोरोनाच्या उपचारात टोसिहिजुबॅम औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या तिसऱ्या Third Wave लाटेचा धोका वाढला आहे. असून सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलली जाणे सुरु आहे. देशात लसीकरणाचा वेग वाढवला आहे. लोकांमध्ये संसर्ग होऊ नये यासाठी सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढ्यात आता आणखी एक पाऊल भारताने India Goverment टाकलं असून डीसीजीआयने कोरोनाच्या उपचारात टोसिहिजुबॅम tocilizumab औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. या औषधाचा वापर रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित असलेल्या वृद्ध व्यक्तींवर Adults उपचारासाठी केला जाईल. याबाबतची माहिती औषध निर्मिती करणारी कंपनी हेटेरो ड्रग्जसने आज म्हणजेच सोमवारी दिली आहे.

हेटेरोने सोमवारी जाहीर केले की भारतातील औषध नियंत्रक जनरलने रुग्णालयात दाखल प्रौढांमध्ये कोविड -१९ च्या उपचारासाठी भारतातील त्याच्या टोसिलिझुमाबच्या आपत्कालीन वापरला मान्यता दिली आहे.

हे औषध रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या लोकांना कॉर्टिकोस्टेरॉइड या ऑक्सिजनची किंवा एक्स्ट्रा कॉर्पोरिअल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशनची गरज आहे अशा रुग्णांना दिलं जाईल.

हेटेरो ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर बी पार्थ सारधी रेड्डी यांनी औषधाच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाल्यावर या औषधामुळे कोरोना रुग्णांना याचा फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. हैदराबादमधील Hyderabad जडरेचला येथील हेटेरोच्या बायोलॉजिक्सचे युनिट हेटेरो बायोफार्मामध्ये या औषधाची निर्मिती होणार आहे. तर सप्टेंबर September अखेरपर्यंत औषध उपलब्ध होऊ शकेल.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Axe Attack : भयानक! पत्नी अन् मुलासमोरच कुऱ्हाडीनं शीर केलं धडावेगळं, अमेरिकेत भारतीय व्यक्तीची निर्घृण हत्या

India-Pakistan Match: 'माझा देश माझं कुंकू' मोहीम;भारत-पाक सामन्यावरुन ठाकरे आक्रमक

Urine symptoms of kidney failure: लघवीद्वारे 'ही' लक्षणं दिसली तर समजा किडनी फेल झालीये; बदल ओळखून वेळीच उपचार घ्या

RBI News : आता EMI चुकला तर फोन होणार बंद, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पिकअप गाडी आणि कारचा अपघात, ३ ठार, १२ जखमी

SCROLL FOR NEXT