Mask Saam TV
देश विदेश

काळजी घ्या! कोरोनाचा धोका वाढला; या राज्यात पुन्हा मास्क सक्ती

कर्नाटकमध्ये एका दिवसात 525 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना (corona) व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत (corona new patients) वाढ होत असल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. अशातच कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कर्नाटक (Karnataka) राज्यात सरकारने पुन्हा मास्क घालणे अनिवार्य केले आहे. कर्नाटक राज्यातील सार्वजनिक ठिकाणे, मॉल्स, हॉटेल, दुकाने आणि कारमध्ये मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं आहे. तसा आदेश राज्य सरकारने शुक्रवारी जारी केला. (Corona Virus Latest News In Marathi)

बंगळुरूमध्ये एका दिवसात 494 पॉझिटिव्ह

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकमध्ये एका दिवसात 525 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चिंताजन बाब म्हणजे यातील तब्बल 494 रुग्ण एकट्या बंगळुरू शहरातील आहे. या विषाणूमुळे कोणाचाही मृत्यू झाला नसला तरी, येथे कोरोनाबाधित रुग्णांचा सक्रीय दर 2.31 टक्क्यांवर पोहचला आहे.

माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कर्नाटकात 228 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्या कर्नाटक राज्यात कोरोनाचे 3 हजार 177 इतके सक्रीय रुग्ण आहेत. यापैकी, बेंगळुरूमधील 3 हजार 061 रुग्ण आहेत. दरम्यान, बंगळुरू शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्ण आढळून येत असल्याने सरकारने पुन्हा एकदा राज्यात मास्क सक्ती केली आहे. त्यानुसार, आता राज्यातील सार्वजनिक ठिकाणे

महाराष्ट्रात 24 तासांत 3,081 बाधित

दुसरीकडे कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसून येत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात 3081 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईत 1956 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, व्हायरसमुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

Green Chili Pickle: गावरान पद्धतीने बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं, वर्षानुवर्षे टिकून राहील चव

Maharashtra Live News Update : महात्मा फुलेवाडा आमच्या ताब्यात द्या; राज्य सरकारला समता परिषदेचे पत्र

Shocking : लग्नाला सुट्टी मिळाली नाही; लग्नाच्या एक दिवसाआधी ऑडिटरने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT