Corona: चिंता वाढली! चीनमध्ये पुन्हा कोरोना विस्फोट; अनेक शहरात लॉकडाऊन Saam Tv
देश विदेश

Corona: चिंता वाढली! चीनमध्ये पुन्हा कोरोना विस्फोट; अनेक शहरात लॉकडाऊन

चीनमध्ये परत एकदा कोरोना (Corona) विषाणूने चांगलेच डोके वर काढले आहे

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: चीनमध्ये परत एकदा कोरोना (Corona) विषाणूने चांगलेच डोके वर काढले आहे. अनेक शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २०१९ मध्ये वुहान शहरामध्ये झालेल्या कोरोना विस्फोटाप्रमाणे परत एकदा चीनमध्ये महामारी पसरण्यास सुरुवात झाली आहे. चीनमध्ये रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्या ३ हजार ३९३ कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. साधारण २ वर्षांनंतर चीनमध्ये (China) पहिल्यांदा ३ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे चीनमधील नागरिकांची चिंता परत एकदा वाढली आहे. कोरोना (Corona) महामारीचा उद्रेक बघता चीनमधील काही शहरामध्ये लॉकडाऊन (Lockdown) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील पहा-

दक्षिण चीनमधील टेक हब म्हणून ओळख असलेल्या शेन्जेन शहरामध्ये रविवारी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या शहरामधील लोकसंख्या जवळपास १ कोटी ७५ लाख ६० हजार इतकी आहे. या शहरामध्ये रविवारी ६६ कोरोना रुग्णांची नोंद झाल्यावर लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेन्जेन हे शहर हाँगकाँगच्या सीमेवर आहे. सध्या हाँगकाँगमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काळजी म्हणून स्थानिक प्रशासनाने शेन्जेन शहरामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनाचा ननीव व्हेरियंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आल्याचे स्थानिक अधिकाऱ्यानी माहिती दिली आहे.

शनिवारी चीनमध्ये कोरोनाचे २ हजार कोरोना रुग्ण आढळले होते. तर रविवारी ही संख्या १ हजारांपेक्षा जास्त वाढली आहे. रविवारी चीनमध्ये ३ हजार ३०० नवे कोरोना रुग्ण आढळले आहे. यामुळे परत एकदा चीनमध्ये कोरोना महामारी डोक वर काढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे चीनमध्ये कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे बघता प्रशासनाने (administration) खबरदारी म्हणून शांघायमधील शाळा सध्या बंद करण्यात आला आहेत. याबरोबरच कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ईशान्येकडील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. देशात सुमारे १९ प्रांतांमध्ये ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकारांचा प्रादुर्भाव आहे. जिलिन शहर अंशतः बंद करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, रशिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेला लागून असलेले हुनचुन शहर वाढत्या कोरोना रुग्णांमुळे १ मार्चपासूनच बंद करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात ३ तात्पुरती रुग्णालये बांधण्यात आले आहेत. कोरोना विषाणू सर्वप्रथम चीनमध्येच आढळून आला होता. तेव्हापासून चीनमध्ये झिरो कोविड धोरण लागू आहे. चीनने लॉकडाऊन, प्रवासी बंदी याबरोबर अनेक निर्बंध लागू केले होते. चीनवरच कोरोना विषाणू पसरवल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. जगभरामध्ये कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला आहेत. मात्र, चीनमध्ये परत एकदा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जगभराच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

SCROLL FOR NEXT