Coromandel Express horrific train accident
Coromandel Express horrific train accident  SAAM TV
देश विदेश

Coromandel Express Horrific Train Accident : डोळे उघडले तेव्हा १०-१५ प्रवासी अंगावर पडले होते...; अपघातग्रस्त ट्रेनमधील प्रवाशानं सांगितला थरारक प्रसंग

Nandkumar Joshi

Coromandel Express Train Accident : ओडिशा येथील बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी तीन रेल्वेगाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ५० हून अधिक प्रवाशी मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. तर शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वे रुळांवरून घसरून अपघात झालेल्या एक्स्प्रेसमधील एका प्रवाशानं अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला. (latest Marathi News)

बहनागा रेल्वे स्थानकाजवळ दोन रेल्वेगाड्या आणि एक मालगाडी अशा तीन ट्रेनमध्ये भीषण अपघात झाला. आधी दुरांतो एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक झाली. त्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेस पाठीमागून धडकली, अशी माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त ट्रेनमधील एका प्रवाशानं यावेळी थरारक अनुभव सांगितला.

मी ट्रेनमध्ये झोपलो होतो. मोठा आवाज झाला. डोळे उघडले. डब्यातले दहा ते पंधरा प्रवासी माझ्या अंगावर येऊन पडले होते. त्या सर्वांच्या खाली मी अडकलो होतो, असे या प्रवाशाने सांगितले. माझ्या हाताला लागलं आहे. मानेला दुखापत झाली आहे. किती प्रवाशांचा मृत्यू झाला अशी विचारणा केली असता, मी जेव्हा डब्याच्या बाहेर आलो तेव्हा तेथील दृश्य भयावह होते, असे त्याने सांगितले. (Railway Accident)

अपघातानंतर या मार्गावरील सर्व ट्रेन रद्द

ओडिशामधील रेल्वे अपघातानंतर या मार्गावरील सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मदत आणि बचावकार्य वेगाने राबवले जात आहे. अपघाताच्या ठिकाणी स्थानिक प्रशासन कार्यरत आहे. एनडीआरएफ पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.

मदतीसाठी ५० रुग्णवाहिका आहेत. जखमींचा आकडा वाढत आहे. त्यामुळे काही जखमींना बसमधून रुग्णालयात पोहोचवण्यात येत आहे, अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shekhar Suman : शेखर सुमन यांचा भाजप प्रवेश; कंगना रणौतचा प्रचार करणार का?

Live Breaking News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Loksabha Election: उत्सव लोकशाहीचा! सेलिब्रिटी ते राजकीय मंडळी; 'या' दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्का; PHOTO

Nagpur News : महिलेचा मोबाईल नंबर घेण्यासाठी लावली ५० हजाराची पैज; तिघे मित्र पोलिसांच्या ताब्यात

PM Modi Rally: काँग्रेस, आरक्षण आणि 26/11; अहमदनगरमध्ये PM मोदींची विरोधकांवर चौफेर फटकेबाजी

SCROLL FOR NEXT