Odisha Coromandel Express Accident Update SAAM TV
देश विदेश

Coromandel Express Accident: आधी दुरांतो- मालगाडीची धडक, नंतर कोरोमंडल एक्स्प्रेस पाठीमागून धडकली; रेल्वे अपघाताचं कारण आलं समोर

Odisha Coromandel Express Accident Update : ओडिशा येथील बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Nandkumar Joshi

Odisha Coromandel Express Accident Update : ओडिशा येथील बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. तर साडेतीनशेहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची पथकांकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, या भीषण रेल्वे अपघातामागील कारण समोर आलं आहे. दोन नव्हे, तर तीन ट्रेनचा अपघात झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. (latest Marathi News)

बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी हा भीषण रेल्वे अपघात झाला. बहनागा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक झाली. आता या दुर्घटनेत ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

दोन ट्रेन आणि एक मालगाडी अशा तीन रेल्वेगाड्यांमध्ये अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचे सात डब्बे रुळांवरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. या रेल्वे अपघातात ५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ओडिशाचे मुख्य सचिव जेना यांच्या माहितीनुसार, आधी दुरांतो एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक झाली. त्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेस पाठीमागून धडकल्याने या अपघाताची भीषणता अधिक वाढली.

बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये काही प्रवाशांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक जखमींना सोरो सीएचसी, गोपालपूर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये उपचारांसाठी दाखल केले आहे.

अपघातानंतर या मार्गावरील सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहेत. तर जवळपास ५० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. जखमींचा आकडा अधिक असल्याने काही रुग्णांना बसमधून रुग्णालयात नेण्यात येत असल्याची माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली.

रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

हावड़ा- 033 - 26382217 

खरगपूर - 8972073925, 9332392339

बालासोर- 8249591559, 7978418322

शालीमार (कोलकाता) - 9903370746

- रेलमदद- 044- 2535 4771

मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाखांची मदत

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख रुपये, तर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना प्रत्येकी २ लाख आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपये मदत देण्यात येईल, अशी घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT