Ashoka pillar inscription sparks controversy in Srinagar after plaque vandalized at Hazratbal shrine. saam tv
देश विदेश

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Political Row in Jammu and Kashmir Over Ashoka Pillar : अशोक स्तंभ कोरलेल्या शिलापटाची जमावाकडून तोडफोड करण्यात आल्यानं जम्मू काश्मीरमध्ये राजकीय वातावरण चांगलचं तापलयं. नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी काय म्हटलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जम्मू आणि काश्मीरची राजधानी असणाऱ्या श्रीनगरमधील हजरतबल दर्ग्यातील शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद पेटलाय. संतप्त जमावानं तो शिलापट फोडला आणि दर्ग्यात कोणत्याही प्रकारची प्रतिमा बसवता येणार नसल्याचं म्हटलयं...हा संगमरवरी शिलापट दोन दिवसांपूर्वी वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. दारक्षण अंद्राबी यांनी उद्घाटनादरम्यान बसवला होता.मात्र आता याचं शिलापटावरील अशोक स्तंभाच्या चिन्हामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झालेत...वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी या घटनेचा निषेध केलाय

मात्र दुसरीकडे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या कृतीचं समर्थन केलंयं... त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. धार्मिक स्थळावर अशोक स्तंभाची गरज काय? असा सवालही अब्दुल्ला यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्यावर सडकून टीका केलीय.

भारताच्या इतिहासात, संस्कृतीत आणि राष्ट्रीय अस्मितेत अशोक स्तंभाला विशेष महत्त्व आहे. अशोक स्तंभ राष्ट्रीय चिन्ह आहे. अशावेळी एका जमावाकडून अशोक स्तंभ असलेल्या शिलापटाची तोडफोड करण्यात आल्यानं अनेकांची नाराजी व्यक्त केलीय. राष्ट्रीय प्रतीकाचं अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा सूर उमटतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

SCROLL FOR NEXT