Police investigation underway after a businessman died following a violent altercation with food delivery workers near Rajiv Chowk, Delhi. Saam Tv
देश विदेश

फूड डिलीवरीवाल्यासोबत वाद; हेल्मेट आणि लाथाबुक्क्यांनी मारलं, व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं?

Connaught Place Food Delivery Fight Death Case: दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादातून 36 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला. हेल्मेट व लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारहाणीमुळे राजधानीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील अतिशय वर्दळीच्या आणि पॉश समजल्या जाणाऱ्या कनॉट प्लेस परिसरात एक धक्कादायक हत्या प्रकरण उघडकीस आले आहे. राजीव चौक परिसरात फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांशी झालेल्या वादातून 36 वर्षीय व्यावसायिकाची बेदम मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान 17 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला आहे.

मृत व्यावसायिकाचे नाव शिवम गुप्ता असे असून, ही घटना 3 जानेवारी रोजी घडली होती. शिवम गुप्ता आपल्या एका मित्रासोबत कनॉट प्लेसमधील एका पार्टीसाठी गेला होता. पार्टी संपल्यानंतर राजीव चौक मेट्रो स्टेशनजवळ त्याने एका फूड डिलिव्हरी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे पाणी मागितले.

याचवेळी दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. आरोपींनी शिवम गुप्ता यांच्या डोक्यावर हेल्मेटने वार केले तसेच लाथा मारून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत शिवम यांना प्रथम एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर आरएमएल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच 19 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला BNS कलम 110 आणि कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पुढे जात असताना आणखी कलमे जोडली जाऊ शकतात, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, घटनेत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. राजधानीतील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अशोक खरात प्रकरणात नवा वाद उफाळला

Plane Crash : १२५ सैनिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात; ६६ जणांचा मृत्यू

Hair Dandruff Removal Tips: केसांतला कोंडा घालवण्यासाठी घरच्या घरी करा 5 सोपे उपाय

Eyeliner Tips : 'आयलाइनर'शिवायही तुमचे डोळे सुंदर अन् रेखीव दिसतील; ट्राय करा 'या' सिंपल मेकअप ट्रिक्स

Dhurandhar 2 : झुकेगा नहीं साला! 'धुरंधर २'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, ५व्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT