Mallikarjun Kharge On PM Modi Saam TV
देश विदेश

Mallikarjun Kharge On PM Modi: पंतप्रधान मोदी विषारी सापासारखे; मल्लिकार्जुन खरगेंची टोकाची टीका

Mallikarjun Kharge On PM Modi: कर्नाटकात निवडणूक प्रचारादरम्यानच्या भाषणात खरगे यांनी हे वक्तव्य केलं होतं.

साम टिव्ही ब्युरो

Mallikarjun Kharge On PM Modi: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुले वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. कर्नाटकात निवडणूक प्रचारादरम्यानच्या भाषणात खरगे यांनी हे वक्तव्य केलं होतं.

मल्लिकार्जुन खरगे यांनी कलबुर्गी येथे जनतेला संबोधित करताना आपल्या भाषणात म्हटलं होतं की, तुमच्या विचारसरणी आणि तत्त्वांच्या जोरावर या देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही पुरेसे आहात. तुमची विचारधारा, तुमचा सिद्धांत अतिशय चुकीचा आहे, त्यामुळे देशाचा नाश होत आहे. (Latest News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही विष समजा किंवा नका समजू मात्र तुम्ही त्याच्या संपर्कात आलात तर तुमचा मृत्यू निश्चित आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी खरगे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. (Political News)

मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या वक्तव्यानंतर स्पष्टीकरणही दिलं आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केलेला नाही. मी भारतीय जनता पक्षाला साप म्हटलं होतं, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT