Congress President Election Shashi Tharoor Latest Update News SAAM TV
देश विदेश

Congress President Election : शशी थरूर यांनी उमेदवारी अर्ज भरला खरा, पण फसले; माफी मागावी लागली

शशी थरूर यांना एक चूक महागात पडली. ती चूक व्हायरल झाल्यानंतर अखेर माफी मागावी लागली.

Nandkumar Joshi

Congress President Election Latest Update: काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरचा चुकीचा नकाशा देण्यात आला आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शशी थरूर पुरते फसले. अखेर त्यांना याबाबत माफी मागावी लागली. त्यांनी झालेली चूक कबूल करत, ती सुधारली देखील आहे.

काँग्रेस (Congress) अध्यक्षपद निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगेंची एन्ट्री झाल्यानं नवा ट्विस्ट आला. त्यामुळं अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली. खरगे हे गांधी कुटुंबीयांचे सर्वात जवळचे मानले जातात. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निवडणुकीत गांधी कुटुंबातील कुणीही सदस्य नाही. अध्यक्षपदासाठी आता मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात निवडणूक होत आहे. (Tajya Batmya)

शशी थरूर यांनी घोषणापत्रात अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले आहे. काँग्रेसला निश्चितच पक्ष मजबूत करायला हवा आणि पक्षाच्या सर्व राज्यांतील प्रदेशाध्यक्षांना सर्व अधिकार देऊनच हे शक्य आहे, असे शशी थरूर यांनी सांगितलं आहे. पक्षाच्या तळागाळातील पदाधिकाऱ्यांना सक्षम केलं तरच हे सर्व शक्य आहे. सर्व नेत्यांना त्यांच्या पातळीवर काम करण्याचे अधिकार दिले पाहिजेत, असे थरूर यांनी घोषणापत्रात म्हटले आहे.

खरगे विरुद्ध थरूर सामना रंगणार

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी शुक्रवारी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. थरूर हे गांधी कुटुंबाच्या विरोधी गटातील नेत्यांपैकीच एक आहेत. G 23 समूहातील नेते शशी थरूर हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात बदल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. आता अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होणार असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, जी २३ समूहाच्या नेत्यांची नुकतीच बैठक झाली. गुरुवारी रात्रीच आनंद शर्मा यांच्या घरी ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात समूहातील ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. यापूर्वी जी २३ समूहाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनेत बदल करण्याची मागणी केली होती. पण संघटनेतही असे काही नेते आहेत, ते जी २३ वर नाराज आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांना गांधी कुटुंबीयांचा पाठिंबा असल्याचे मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SCROLL FOR NEXT