Rahul Gandhi-Sonia Gandhi Saam TV
देश विदेश

Rahul-Sonia Gandhi Plane Emergency Landing : सोनिया-राहुल गांधींच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, खराब हवामानामुळे दिल्लीला जाणारं विमान भोपाळमध्येच उतरवलं

Plane Emergency Landing : भोपाळच्या राजा भोज एयरपोर्टवर हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

साम टिव्ही ब्युरो

Bhopal News : बंगळुरु येथील विरोधकांच्या बैठकीनंतर दिल्लीला परत निघालेल्या कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. भोपाळच्या राजा भोज एयरपोर्टवर हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं इमर्जन्सी लॅंडिग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते. सोनिया आणि राहुल गांधी बेंगळुरूहून दिल्लीला परतणार होते.

विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ते भोपाळ विमानतळावर उतरवण्यात आले. 7 वाजून 40 मिनिटांनी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मुसळधार पावसामुळे विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी भोपाळ विमानतळावर पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर भोपाळचे काँग्रेस नेते विमानतळाकडे रवाना झाले. पुढील नियमित विमानाने दिल्लीला जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मॅरेथॉनमध्ये जिंकली, पण आयुष्याच्या शर्यतीत हरली; दहावीच्या विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने मृत्यू

महायुद्ध होणार? अमेरिका-व्हेनेझुएला संघर्ष चिघळणार; अमेरिकेला किम जोंग उन यांचा इशारा

उमेदवारांचा बिनविरोध विजय वादात, सामाजिक कार्यकर्ते कोर्टात जाणार? भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढलं

Zilla Parishad Election: राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी? निवडणुकांबाबत अजितदादांचं मोठं विधान

Sunday Horoscope : पैसे मोजायला वेळ मिळणार नाही; रविवारी ५ राशींच्या लोकांवर धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT