Bharat Jodo Yatra Saam Tv
देश विदेश

Bharat Jodo Yatra : तीच चाल, तीच स्टाइल...भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसारखा हुबेहुब दिसणारा 'तो' तरूण कोण?

राहुल गांधींसारखा हुबेहुब दिसणारा 'तो' तरूण कोण?

वृत्तसंस्था

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशमार्गे हरियाणामध्ये दाखल झाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. यूपीमध्ये बागपतमार्गे मेरठच्या दिशेने यात्रा सुरू असताना राहुल गांधींसारखा दिसणारा एक व्यक्ती चर्चेत आला आहे.

फैसल चौधरी नावाची ही व्यक्ती हुबेहुब राहुल गांधींसारखी दिसत होती. फैसल यांनी राहुलसारखा टी-शर्ट घातला होता. त्याच्याप्रमाणेच थोडी दाढीही वाढली होती. बागपतमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान ते राहुल गांधी यांच्या सोबत सामील झाला.

फैसल चौधरी हे मेरठचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ते काँग्रेस पक्षाचे सदस्यही आहेत. फैसल चौधरी जेव्हा भारत जोडो यात्रेत पोहचले तेव्हा त्यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. फैसल यांना पाहून सुरूवातीला पोलिसांनाही वाटलं की राहुल गांधीच आले आहेत.

तुम्ही राहुल गांधीसारखे दिसता... हे ऐकून तुम्हाला कसे वाटते? या प्रश्नावर फैजल म्हणाले की, छान वाटत मी राहुल गांधींचा मोठा चाहता आहे. राहुल गांधी यांच्यासारखाच मी दिसतो याचा मला अभिमान वाटतो. गेल्या एक वर्षापासून लोकं माझ्याकडे फोटो काढायला येतात आणि मी अगदी राहुल गांधींसारखाच दिसतो असं सांगतात. लोक मला राहुल गांधी म्हणतात तेव्हा आनंद होतो. तसेच हा मोर्चा द्वेषाच्या विरोधात असून यात्रेच्या माध्यमातून सार्वजनिक समस्या मांडल्या जात आहेत. 

काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. राहुल गांधींनी आतापर्यंत तीन हजार किलोमीटरहून अधिक अंतर चालले आहे. आता फक्त ३४२ किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. हरियाणानंतर ही यात्रा पंजाब आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : पावसाळ्यात रात्री डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपताय? सावधान! शरीरावर होतायेत 'हे' गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update : धोकादायक आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT