Adhir Ranjan Chowdhary Saam TV
देश विदेश

Adhir Ranjan Chowdhary suspended : PM नरेंद्र मोदींची नीरव मोदीशी तुलना, अधीर रंजन चौधरी निलंबीत

Political News : विशेषाधिकार समिती त्यांच्या विरोधात अहवाल सादर करेपर्यंत अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नीरव मोदींशी करणे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना महागात पडलं आहे. अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. विशेषाधिकार समिती त्यांच्या विरोधात अहवाल सादर करेपर्यंत अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे प्रलंबित आहे. याप्रकरणी समिती चौकशी अहवाल सादर करणार आहे. तोपर्यंत अधीर रंजन चौधरी यांना सदनातून निलंबित करण्यात येणार आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, अधीर रंजन चौधरी यांना माफी मागावी अशी मागणी आम्ही केली होती, मात्र त्यांनी माफी मागितली नाही. त्यांच्या विरोधात एक ठराव मांडण्यात आला जो मान्य करण्यात आला.

अधिर रंजन चौधरी काय म्हणाले?

नीरव मोदी हजारो कोटी रुपये लुटून देशातून पळून गेला. त्याला कोणी पकडू शकले नाही. आमच्या एनडीए सरकारमध्ये एवढी ताकद आहे, पण त्यांना हात लावू शकली नाही. नीरव मोदी कॅरेबियन समुद्रकिनारी मजा करताना दिसला होता.

मला वाटलं होतं की नीरव मोदी आयुष्यभर आपल्यापासून दूर गेलाय. पण मणिपूरची घटना पाहिल्यावर कळतंय की नीरव मोदी आपल्यापासून दूर गेला आहे. इथे भारतातच आहे. नरेंद्र मोदी अजूनही नीरव मोदी म्हणून शांत बसले आहेत. (Latest Marathi News)

आम्ही पंतप्रधानांना सभागृहात खेचून आणलं

अविश्वास ठरावाची ताकद बघा, आम्ही पंतप्रधान मोदींना सभागृहात खेचून आणलं आहे. संसदीय परंपरेचे ही ताकद आहे. मणिपूरवरील चर्चेत पंतप्रधान मोदींनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा होती. पण त्यांनी सभागृहात न येण्याची शपथ का घेतली होती, माहीत नाही. अविश्वास प्रस्ताव आणण्याचा आम्ही यापूर्वी विचार केला नव्हता, परंतु आम्हाला आणावा लागला, असंही चौधरी यांनी म्हटलं.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT