Bihar Shocking  Saam tv
देश विदेश

Bihar Politics : बिहारमध्ये काँग्रेसचं पानिपत; कोणत्या चुका ठरल्या पराभवाचं कारण?

Bihar Political News : बिहारमध्ये काँग्रेसचं चक्कं पानिपत झालंय.. मात्र तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल सोबत असतानाही काँग्रेसचा सुफडा साफ का झाला? काँग्रेस-राजद युतीच्या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

बिहारमध्ये परिवर्तन होत असल्याचं वक्तव्य करणारे हे आहेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव... मात्र प्रत्यक्षात निकालात एनडीएने 200 पेक्षा जास्त जागांवर मुसंडी मारलीय.. तर राजद आणि काँग्रेसचं अक्षरशः पानिपत झालंय..ते नेमकं कसं पाहूयात...

2020 मध्ये 43 जागा जिंकणाऱ्या जदयूने 80 पार झेप घेतलीय.. तर 74 जागांवर विजय मिळवलेल्या भाजपनेही नव्वदीपार जागा जिंकल्या आहेत. चिराग पासवान यांच्या लोजपने 1 जागा जिंकली होती.. आता लोजपचा स्ट्राईकरेट जवळपास 80 टक्के आहे... दुसरीकडे 75 जागा जिंकलेल्या राजदची 45 पेक्षा जास्त जागांवर घसरण झालीय.. तर काँग्रेसला दोन आकडेही गाठता आले नाहीत

मात्र काँग्रेस आणि राजदचा एवढा मोठा पराभव होण्याची कारणं काय आहेत? पाहूयात...

या कारणांमुळे महागठबंधनला फटका

जागावाटपाचा घोळ अखेरपर्यंत कायम

11 जागांवर एकमत न झाल्यानं मैत्रिपूर्ण लढण्याची नामुष्की

काँग्रेसला अपेक्षित यश नाही

लोजप एनडीए सोबत गेल्यानं आरजेडीच्या मतांची विभागणी

कुटुंबात एक सरकारी नोकरीचा मुद्दा पटवून देता आला नाही

एका बाजूला काँग्रेसचा सुफडा साफ झालाय.. त्याचं कारण काँग्रेसचं दलित मतांचं पॉकेट चिराग पासवान यांच्यामुळे एनडीएकडे वळालंय. आता या विजयानंतर 5 वर्षे मजबूतीने सरकार चालवणार असल्याचं चिराग पासवान यांनी म्हटलंय..

मध्य प्रदेश, हरयाणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसलाय.. त्यानंतर आता बिहारमध्येही झटका बसल्यानं काँग्रेस पुन्हा उभारी घेण्यासाठी अंग झटकून जनतेत जाणार का? आणि चुकलेल्या रणनीतींमध्ये दुरुस्ती करणार का? याकडे लक्ष लागलंय.. कारण पंडित नेहरुंनी बिहारमधील बांराबाकीमधून राजकारणात एण्ट्री केली होती.. त्याच बिहारमध्ये त्यांच्याच जन्मदिनी काँग्रेसचा न भुतो न भविष्यती पराभव झालाय.. त्यामुळे या पराभवानंतर काँग्रेस आणखी गाळात जाणार की फिनिक्स प्रमाणे पुन्हा उभारी मारणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: श्रेयस की इशान, तिलक वर्माच्या जागी कोण खेळणार? सूर्याने २ वाक्यात विषय संपवला अन् कारणही सांगितलं

Akola : वाह रे पठ्ठया! अकोल्यात 'रूग्णसेवक' बनला 'नगरसेवक'; वाचा संपूर्ण प्रवास

Long And Short Haircuts: लांब आणि छोट्या केसांसाठी हे आहेत 5 ट्रेडिंग हेअरकट्स, एकदा नक्की ट्राय करा

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! २०२६ मध्ये पगारवाढ नाहीच; कधी येणार एरियर?

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनासाठी साधा आणि सुंदर लूक कसा करावा? जाणून घ्या आयडिया

SCROLL FOR NEXT