Panjab/Congress Saam TV
देश विदेश

Congress: 'कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास आणि नेत्यांच्या अहंकारामुळे काँग्रेसचा पराभव'

पंजाबमध्ये काँग्रेसचा (Panjab Congress) दारुण पराभव झाला असून आम आदमी पक्षाला (आप) स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंदीगड : पंजाबमध्ये काँग्रेसचा (Panjab Congress) दारुण पराभव झाला असून आम आदमी पक्षाला (आप) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता हाती आलेल्या निकालांनुसार पंजाबमध्ये AAP ला दोन तृतीयांश मिळालं आहे. काँग्रेसच्या (Congress) या पराभवाला काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी असल्याचं वक्तव्य काँग्रेसच्या खासदारांनी केलं.

काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सिंग गिल यांनी ट्विट करून काँग्रेसच्या पराभवावरती गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत कलह, वरिष्ठांचा दबाव नसणे, तसंच पैशांवरती दिलेली टिकीट कार्यकर्त्यांचा झालेल्या भ्रमनिरास आणि नेत्यांचा अहंकार यामुळे पंजाबमध्ये काँग्रेसचा पराभव झाला असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी ट्विट करून आपचे अभिनंदन केले आहे. जनतेचा आवाज हा देवाचा आवाज असल्याचे त्यांनी सांगितले. पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारला असल्याचं ते म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT