Adani Row News  Saam tv
देश विदेश

Adani Row : अदानी वादावरून राजकारण तापलं; काँग्रेसने बोलावली तातडीची बैठक, राज्यसभेत आज काय होणार?

राज्यसभेत आजही अदानीच्या कथित घोटाळ्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Shivaji Kale

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लीकार्जुन खर्गे यांनी समान विचारधारा असलेल्या विरोधी पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये हिंडबर्ग रिसर्च आणि अदाणीच्या कथित घोटाळ्यावर संसदेच्या संयुक्त समितीद्वारे चौकशी करण्याची मागणीवर चर्चा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं राज्यसभेत आजही अदानीच्या कथित घोटाळ्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

लोकसभेत मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधी यांना नोटीस धाडण्यात आली आहे. राहुल गांधी यांना १५ फेब्रुवारी पर्यंत उत्तर देण्यास सांगितले. राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर अदानी समूहाशी संबंध असल्याचे आरोप केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपाचा मुद्दा पुन्हा एकदा लोकसभेत गाजण्याची शक्यता आहे.

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विशेष अधिकारांचं उल्लंघन केलं म्हणून उत्तर मागितले आहे. त्यामुळं आज लोकसभेत कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

कोणतीही नोटीस न देता आणि पुरावे न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्या विरोधात निराधार आरोप केले असा आक्षेप कायदामंत्री किरण रिजिजू, खासदार निशिकांत दुबे, माजी मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी घेतला आहे.

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधींच्या भाषणाचा संदर्भ देत लोकसभेच्या नियम 353 आणि 369 चे उल्लंघन झालं आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्यसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT