Congress Political News Saam tv
देश विदेश

Congress 3rd Candidate List : काँग्रेसकडून लोकसभेसाठी तिसरी यादी जाहीर, राज्यातून कुणाला मिळाली उमेदवारी?

Congress 3rd Candidate List for lok sabha election : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने तिसऱ्या यादीत ५७ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Vishal Gangurde

Lok sabha Election 2024 :

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने तिसऱ्या यादीत ५७ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील ७ लोकसभा मतदारसंघाचा सामावेश आहे. राज्यातील उमेदवारांमध्ये शाहू महाराज, प्रणिती शिंदे, रविंद्र धंगेकर आदी नेत्यांचा सामावेश आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत अरुणाचल प्रदेशमधील २ उमेदवार, गुजरातमधील ११ उमेदवार, कर्नाटकातील १७ उमेदवार, महाराष्ट्रातील ७ उमेदवार,राजस्थानमधील ६ उमेदवार, तेलंगानाचे ५ उमेदवार, पश्चिम बंगालमधील ८ उमेदवार आणि पुदुच्चेरीतील एका उमेदवाराचा सामावेश आहे.

काँग्रेसने पहिल्या यादीत ३९ उमेदवारांची नावे घोषित केली. त्यानंतर दुसऱ्या यादीत ४३ जणांची नावे जाहीर केली. त्यानंतर तिसऱ्या यादीत ५७ जणांची उमेदवारी जाहीर केली. या प्रकारे काँग्रेसने आतापर्यंत १३९ जणांची उमेदवारी जाहीर केली. दक्षिणेतील बहुतांश राज्यातील उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहीर केली आहेत.

कोणाला कुठून तिकीट मिळालं?

गुजरातच्या गांधीनगरमधून सोनल पटेल, सूरतमधून निलेश कुंबानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नबाब तुकी यांना अरुणाचल पश्चिममधून उमेदवारी मिळाली आहे. कर्नाटकाच्या चिक्कोडीमधून प्रियंका जारकीहोली यांना उमेदवारी मिळाली आहे.

सुनील शर्मा यांना राजस्थानच्या जयपूरमधून ओळख मिळाली आहे. पालीतून संगीता बेनिवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर अधीर रंजन चौधरी यांना बरहामपूरमधून तिकीट मिळालं आहे. त्यांची लढत थेट माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्याशी होईल. तर मालदा दक्षिणमधून अबू हासेम खान चौधरी यांचा मुलगा ईशा खान चौधरी यांना उमेदवारी मिळाली आहे.

राज्यात कोणाला मिळाली उमेदवारी?

पुणे लोकसभा मतदारसंघ - रविंद्र धंगेकर

कोल्हापूर - शाहू महाराज

सोलापूर - प्रणिती शिंदे

अमरावती - बळवंत वानखेडे

नंदुरबार - गोवाल पाडवी

नांदेड - वसंत चव्हाण

लातूर - शिवाजीराव कालगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT