Ajay Nandal Saam Tv
देश विदेश

कुस्तीपटू पूजा नंदलच्या पतीचा अंमली पदार्थाच्या अतिसेवनाने मृत्यू, २ कुस्तीपटूंची प्रकृती चिंताजनक

कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशासाठी पदक जिंकणारी कुस्तीपटू पूजा नंदल यांचा पती अजय नंदल यांचा ड्रग्जच्या अतिसेवनाने मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशासाठी पदक जिंकणारी कुस्तीपटू पूजा नंदल यांचा पती अजय नंदल यांचा ड्रग्जच्या अतिसेवनाने मृत्यू (Death) झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तसेच त्यांचे दोन सहकारी पैलवान रवी आणि सोनू हे देखील गंभीर आहेत, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजयच्या वडिलांनी रवी या पैलवानवर आपल्या मुलाला ड्रग्ज दिल्याचा आरोप करत पोलिसांत (Police) तक्रार दिली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, महाराणी किशोरी महाविद्यालयाजवळ अजयच्या कारमध्ये तिनही पैलवानांनी मद्यपान केले होते, त्यानंतर तिघेही बेशुद्ध पडले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पाहिल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अजयचा मृत्यू झाला, तर रवी आणि सोनूची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे.

मृत अजय नंदल हा गढी बोहर गावचा रहिवासी असून, तो राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होता. अजय हा महिला कुस्तीपटू पूजा नंदल यांचा पती होता. पूजाने इंग्लंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कुस्तीत ७६ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकून देशाची मान उंचावली होती.

पूजा आणि अजय यांचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. अजय हा राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आहे आणि पूजा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे. मृत अजय नंदल हा क्रीडा कोट्यातून सीआयएसएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता.

अजयच्या मृत्यूनंतर ही बातमी संपूर्ण गावासह राज्यात पसरली. त्यांच्या मृत्यूची बातमीने सर्वाने धक्काच बसला. अजय नंदल हा रोहतक येथील मेहेर सिंग आखाड्यात सराव करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:भाजप, राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती, म्हणून गोव्याला सदस्य हलवले,मंत्री भरत गोगावलेंचा टोला

शिवजयंतीच्या कार्यक्रमात तरूणांचा धिंगाणा; छत्रपतींच्या कोल्हापुरात तरूणाईचा लाजिरवाणा प्रकार, VIDEO

Ghavan recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट करा कोकणी स्टाईल स्वादिष्ट घावणे, वाचा सोपी रेसिपी

Saturday Horoscope: अचानक पैसा येईल, ५ राशींनी आरोग्याकडे द्या विशेष लक्ष; वाचा आजचे राशीभविष्य

Saturday Horoscope : पार्टनरशी कडाक्याची भांडण होईल, महत्वाचा निर्णय पुढे ढकला; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

SCROLL FOR NEXT