LPG Cylinder Saam Tv
देश विदेश

LPG Cylinder Price Drops: खूशखबर! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात, सिलेंडर 171 रुपयांनी स्वस्त

LPG Cylinder Price: घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये सध्या कोणताही बदल झालेला नाही.

साम टिव्ही ब्युरो

Todays LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडरच्या किमतीत आज १ मे २०२३ रोजी म्हणजेच कामगार दिनी मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 171.50 रुपयांची कपात केली आहे. मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये सध्या कोणताही बदल झालेला नाही.

अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती बदलल्या आहेत. नव्या दरानुसार आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत मुंबईत 1808.50 रुपये असणार आहे. दिल्लीत 1856.50 रुपये, कोलकातामध्ये 1960.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2021.50 रुपये आहे. तेल कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर नवीन दर अपडेट केले आहेत. (Latest Marathi News)

दर महिन्याच्या 1 तारखेला सरकारी तेल कंपन्या गॅसच्या किमतीत बदल करतात. १ एप्रिल २०२३ रोजी देखील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही कपात करण्यात आली होती. त्यानंतर गॅस सिलेंडर सुमारे 92 रुपयांनी स्वस्त झाला होता. तर मार्चमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 350 रुपयांहून अधिक वाढ झाली होती.

घरगुती LPG सिलेंडरचे सध्याचे दर

>> मुंबई- 1112.5 रुपये

>> दिल्ली - 1103

>> कोलकाता - 1129

>> चेन्नई -1118.5

>> पाटणा - 1201

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT