CNG Saam Tv
देश विदेश

महागाईचा आणखी एक धक्का, 6 दिवसात CNGचे दर पुन्हा वाढले

सीएनजीच्या वाढलेल्या किंमती आजपासून लागू करण्यात येणार आहे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे.कारण सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. इंद्रप्रस्थ गॅसने दिल्लीत (Delhi) सीएनजीच्या दरात रुपयांनी वाढ केली आहे. सीएनजीच्या वाढलेल्या किंमती आजपासून लागू करण्यात येणार आहे.

दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्येही सीएनजीच्या (CNG) किमतीत 2 रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर, या शहरांमध्ये प्रति किलो सीएमजीची किंमत आता 78.17 रुपयांवर गेली आहे. याशिवाय गुरुग्राममध्ये राहणाऱ्यांना एक किलो सीएनजीसाठी 83.94 रुपये मोजावे लागतील.

हे देखील पाहा -

दिल्लीत 6 दिवसांत सीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 15 मे रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. सध्या दिल्लीत एक किलो सीएनजीसाठी ग्राहकांना 75.61रुपये मोजावे लागतील.

सध्या राष्ट्रीय राजधानीत वाहन चालवणे कठीण होत चालले आहे. पेट्रोलने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. सीएनजी गॅसच्या दरवाढीमुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यात सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशात भर पडत आहे.

इतर राज्यात दरवाढ

पुण्यात सीएनजी दोन रुपयांनी महाग झाल्याने आता सीएनजीचे भाव प्रति किलो 80 रुपयांवर पोहोचले आहेत. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहे. या अगोदर पुण्यात सीएनजी दर 77.20 रुपये होते.

तर दुसरीकडे नाशिक मध्ये सीएनजी दरात पुन्हा 3 रुपयांनी वाढ झाली आहे. आता सीएनजीचालकांना किलो मागे 86 रुपये मोजावे लागणार आहे. गेल्या महिन्याभरात सीएनजीच्या दरात सतत वाढ होत आहे. काल मध्यरात्रीपासूनच नवे दर लागू करण्यात आले आहे. याआधी नाशिक मध्ये सीएनजीचे दर 80 रुपये किलो होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT