Chhatrapati Shivaji Maharaj Saam Tv
देश विदेश

Chhatrapati Shivaji Maharaj: काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष, मुख्यमंत्र्यांनी केलं छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

Jammu and Kashmir News: काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष, मुख्यमंत्र्यांनी केलं छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

Satish Kengar

Chhatrapati Shivaji Maharaj Statue In Kashmir:

आज काश्मीर खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला आहे. आम्ही पुणेकर संस्था, ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. याच त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर मुख्यमंत्रि शिंदे म्हणाले, ''काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल. त्यांचे मनोबल उंचावत राहील.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने केली. समोरच्या पर्वंतरांगापलिकडे असलेल्या पाकिस्तामनध्ये हा जयघोष पोहोचला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  (Latest Marathi News)

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्याने शत्रू येथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून दहशतवादीही काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाही. ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता.

ते म्हणाले, तेव्हा जवानांनी सुमारे १८०० ट्रक माती भरून त्याठिकाणी पुतळ्यासाठी भक्कम पाया करण्यात आला. याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियनच्या जवानांचे कौतुक केले. सातारा येथील मेजर संतोष महाडीक यांना अभिवादन करीत त्यांच्या बलिदानाची आठवण यावेळी त्यांनी सांगितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT