CM Eknath Shinde, Kolhapur, Ambegoan saam tv
देश विदेश

Eknath Shinde Speech in NDA Meeting : मोदी सरकार 2024 ला सर्व रेकॉर्ड ब्रेक करत सत्तेत येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना व्यक्त केला विश्वास

Political news : संपूर्ण जगामध्ये आज आपल्या देशाचे नाव आदराने घेतले जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde News : शिवसेना हा एनडीएचा सर्वात जुना मित्र आहे. आमची युती एक वैचारिक व भावनिक युती आहे, असे सांगतानाच २०२४ ची निवडणूक ही फक्त नरेंद्र मोदींची नाही तर भारताची आहे. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तुटून २०२४ ला मोदींचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीएच्या बैठकीत बोलताना व्यक्त केला.

आत्मविश्वास नसलेले सर्व विरोधक एकत्र

विरोधी पक्षांच्या बैठकीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, एकाबाजूला विचारधारा असलेले संघटन आहे तर दुसरीकडे विरोधक अद्यापही त्यांचा नेता ठरवू शकलेले नाहीत. आत्मविश्वास नसलेले सर्व विरोधक एकत्र आलेले आहेत, अशी टीका त्यांनी केली. २०२४ ला संपूर्ण देशात पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळेल. संपूर्ण जगामध्ये आज आपल्या देशाचे नाव आदराने घेतले जात आहे. त्यामुळे विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढी एनडीए बळकट होईल, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

अजित पवार सोबत आल्याने महाराष्ट्रात एनडीए मजबूत

एनडीएमध्ये ३८ घटकपक्ष सहभागी आहेत. त्यामुळे २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा देशभरात एनडीएला बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित पवार सोबत आल्याने महाराष्ट्रात एनडीए मजबूत झाल्याचंही ते म्हणाले. डबल इंजिनचे सरकार आल्याने महाराष्ट्राची स्थिती बदलली आहे. आमच्या महायुतीसोबत 210 आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला चिंता नाही, असंही त्यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

अर्थव्यवस्था चांगली राहण्यामागे मोदींचा हात

मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. संपूर्ण जगामध्ये आज आपल्या देशाचे नाव आदराने घेतले जात आहे. त्यामुळे विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढं एनडीए बळकट होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी भारताला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देशाची अर्थव्यवस्था चांगली राहण्यामागे मोदींचा हात आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था कमकुवत झालेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

SCROLL FOR NEXT