Eknath Shinde News Saam tv
देश विदेश

Eknath Shinde News : अमित शहांनी दिलेलं टार्गेट 2026 आधीच पूर्ण करू; CM शिंदेंचा नक्षलवादावर भाष्य करताना शब्द!

cm eknath shinde on naxalist : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षलवादावर बोलताना मोठं भाष्य केलं आहे. अमित शहा यांच्यासोबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना मोठा शब्द दिला आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नक्षलवादावर मोठं भाष्य केलं आहे. 'गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेलं टार्गेट २०२६ आधीच पूर्ण करू, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षलवादावर भाष्य करताना दिला आहे. ते दिल्लीत बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्षलवाद्याच्या मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, '२०२६ पर्यंत नक्षलवाद संपला पाहिजे, असं अमित शहा यांनी सांगितलं आहे. आम्ही गडचिरोली भागात उद्योग आणलं. २०१६ चं टार्गेट त्याआधीच पूर्ण करू. महाराष्ट्रातून नक्षलवाद लवकरात लवकर हद्दपार करू'.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, '50-60 वर्षात झालं नाही, ते काम पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झालं. आज 23 वर्षे झाली. त्यांचं अभिनंदन'. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'महायुती सरकारच्या काळात आणलेले आमचे प्रकल्प, कल्याणकारी योजना यांची थेट तुलना करा. आम्ही उत्तम काम केलं आहे. जनता जनार्दन आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून देईल'.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें बैठकीत काय म्हणाले?

नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, '2014 ते 2024 या पुढील दहा वर्षांत माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र झालं आहे. सशस्त्र माओवादी कॅडरची संख्या 2013 मध्ये 550 होती, ती 2024 मध्ये 56 झाली आहे.  गेल्या 6 वर्षात 96 सशस्त्र माओवादी मारले गेले. 161 पकडले गेले आणि 70 जणांनी आत्मसमर्पण केले. यामुळे त्यांचे नेतृत्व कमकुवत ठरले आहे'.

'माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने आमच्या कार्यकाळात मोठे यश मिळवले आहे. प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. अबुजमाद ते एमएमसी झोनपर्यंतच्या माओवाद्यांच्या विस्तार योजनेलाही मोठा धक्का बसला आहे. आमच्या कार्यकाळात एकाही व्यक्तीची माओवादी संघटनांमध्ये नव्याने भरती झालेली नाही. सुरक्षा दलाचा एकही सदस्य शहीद झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT