सर्वसामान्यांना महागाईचा झटका: कपडे, दारू आणि इलेक्ट्रिकल वस्तूची १० टक्क्यांनी किमती वाढणार Saam Tv
देश विदेश

सर्वसामान्यांना महागाईचा झटका: कपडे, दारू आणि इलेक्ट्रिकल वस्तूची १० टक्क्यांनी किमती वाढणार

इंधन भाववाढीचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : इंधन भाववाढीचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. कच्च्या मालाच्या भाव वाढल्याने कपडे, टीव्ही, फ्रिज, मद्य, साैंदर्य इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तू ८ ते १० टक्क्यांनी महागणार आहेत. काही महिन्यांमध्ये डिझेलच्या भावात माेठी वाढ झाली हाेती. इंधन भाववाढीमुळे पुरवठा साखळीवर माेठा परिणाम झाला हाेता. माल वाहतुकीचा खर्च वाढला हाेता. परिणामी महागाईमध्ये वाढ झाली आहे.

हे देखील पहा-

आता दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंच्या भावात ८ ते १० टक्क्यांनी वाढणार आहे. कपडे, टीव्ही, फ्रिज, साैंदर्य प्रसाधने तसेच इतर इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंचा यामध्ये समावेश राहणार आहे. किराणा, पॅकबंद खाद्यपदार्थ, पर्सनल केअर उत्पादने यासारख्या वस्तुंच्या भावात याअगोदरच वाढलेल्या आहेत. इंधन भाववाढीचा देखील यावर मोठा परिणाम झाला आहे. सप्टेंबरमध्ये इंधन आणि उर्जा विषयक महागाई २४.८ टक्के हाेती. त्यातच लाॅजिस्टिक आणि वेअर हाउसिंगचा देखील खर्च वाढला आहे.

मालवाहतुकीचे भाडे उच्चांकी पातळीवर हाेते. यामुळे किमती वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे कंपन्यांचे मत आहे. काच, कापूस, स्टील, इलेक्ट्राॅनिक चिप अशा आवश्यक रासायनिक कच्चा माल अतिशय महाग झाला आहे. सुती धाग्याच्या किंमतीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे कापड उद्याेगाला माेठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. मागील ६ महिन्यांमध्ये घाऊक महागाईचा भाव वाढला आहे.

किरकाेळ महागाई कमी झाली आहे. तरीदेखील थाेक महागाईमुळे किमतीत वाढ करण्यात येणार आहेत. कंपन्यांच्या वाढलेल्या उत्पादन खर्चाचा अंदाज थाेक महागाईवर येत असतो. उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे कंपन्यांकडून उत्पादनांच्या भावात वाढ करण्यात येणार आहे. दसरा, दिवाळी, छठ पूजा इत्यादी सणासुदीच्या दिवसांमध्ये यावेळी माेठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येत आहे. यातच भाव वाढल्यास मागणीवर परिणाम हाेण्याची शक्यता आहे.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT