pregnant girl Saam Tv News
देश विदेश

Student gives birth: भयंकर घटना! शाळेतच दिला मुलीला जन्म, नंतर खिडकीतून खाली फेकलं

Chhattisgarh News: कोरबा जिल्ह्यात ११वीत शिकणाऱ्या मुलीनं शाळेतच बाळाला जन्म दिला असून, बाळाला तिनं शौचालयाच्या खिडकीतून खाली फेकून दिलंय. आता मुलीची प्रकृती गंभीर असून, खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bhagyashree Kamble

छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात एका ११वीत शिकणाऱ्या मुलीनं बाळाला जन्म दिला आहे. तिनं शाळेतच नवजात मुलीला जन्म दिला असून, नंतर बाळाला तिनं शौचालयाच्या खिडकीतून खाली फेकून दिलं आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर, अधिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणी आरोग्य महिला आणि बाल विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून, मुलीची प्रकृती गंभीर असल्याकारणाने तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

छत्तीसगडच्या पोडी गावातली शासकीय निवासी शाळेत एका ११ वीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिला आहे. ही धक्कादायक बाब मंगळवारी उघडकीस आल्यानंतर परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. याप्रकरणाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थीनीने सातव्या किंवा आठव्या महिन्यातच जन्म दिले आहे. ज्यामुळे मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे'.

मंगळवारी पोडी गावातील एका शासकीय निवासी शाळेत वसतिगृह अधिक्षकांना १७ वर्षीय मुलगी आजारी असल्याची माहिती मिळाली होती. या शाळेत वसतिगृह देखील आहे. ही शाळा आदिवासी विकास विभागामार्फत चालवली जाते. अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी रडत असल्यामुळे तिला रूग्णालयत नेण्यात आले. जिथे तिने कबूल केले की तिने एका मुलीला जन्म दिला होता. मुलीला जन्म दिल्यानंतर तिने मुलीला खिडकीतून बाहेर फेकून खाली दिलं.

याबाबत कोरबा जिल्ह्यातील दंडाधिकारी अजित वसंत सांगतात, 'विद्यार्थिनी गरोदर असल्याची माहिती नसल्यामुळे वसतिगृह अधिक्षकांना निष्काळजीपणाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं आहे. यासंदर्भात आरोग्या महिला आणि बाळ विभागाला चौकशीचे आदेश दिले आहे'. यासंदर्भात कोरबा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ सांगतात, 'मुलीला नवजात शिशु वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिच्या डाव्या फुफ्फुसावर जखमेच्या खुणा आहेत. मुलीची प्रकृती चिंताजनक आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT