आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होणार का?  saam tv
देश विदेश

Ashutosh ranka and Saurav das : सौरव दास, आशुतोष रांका यांच्या कोठडीत वाढ; कोर्टानं काय दिला निर्णय?

CJP protest court reserves order on saurav das and ashutosh ranka custody : सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर कोर्टानं त्यांची कोठडी दोन दिवसांनी वाढवली आहे.

Nandkumar Joshi

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याची मागणी दिल्ली पोलिसांच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीत एसईएम कोर्टाने निर्णय दिला आहे. त्यांच्या कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

सौरव दास आणि आशुतोष रांका या दोघांना १३ ऑक्टोबरला जंतर-मंतर परिसरात विनापरवानगी प्रवेश करण्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांच्या सुटकेसाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणीनंतर निर्णय राखून ठेवला होता. काही वेळाने कोर्टाने निर्णय दिला.

दास, रांकाच्या अटकेवर दिल्ली पोलीस काय म्हणाले?

१३ ऑक्टोबरला सकाळी सौरव दास, आशुतोष रांका, अजिंक्य शिंदे आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अन्य ११ सदस्य जंतर-मंतरवर पोहोचले होते. आंदोलनासाठीच्या ठिकाणांच्या यादीतून हे मैदान हटवण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी त्यांच्या कामात अडथळा आणला. सर्व १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे आणि कायद्याचे उल्लंघन करण्याच्या कथित प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर दास, रांका आणि शिंदे यांना अटक करण्यात आली होती. शांतता राखण्याच्या आणि चांगल्या वर्तवणुकीच्या अटीवर अजिंक्य शिंदे याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT