Saam Tv
देश विदेश

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

CJP new national spokespersons appointed: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल करण्यात आळा असून अनेक नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. कुणाकडे कोणते पद देण्यात आले ते घ्या जाणून..

Priya More
  • कॉक्रोच जनता पार्टीच्या नवीन कार्यकारणीची घोषणा

  • सीजेपीने नव्या टीममध्ये दिली अनेकांना संधी

  • सीजेपीच्या नवीन राष्ट्रीय प्रवक्त्यांची नावे जाहीर

  • सीजेपी ५ सप्टेंबरला दिल्लीत आंदोलन करणार

  • सीजेपीचे इंडिया गेट ते पोलिस मुख्यालय असा काढणार मोर्चा

कॉक्रोच जनता पार्टीने मंगळवारी मोठा निर्णय घेतला. या पक्षाने आपल्या टीममध्ये फेरबदल केले. संघटनेचा विस्तार करत अनेक पदांवर नवीन सदस्यांच्या नियुक्त्या केल्या. पक्षाने सह-संयोजक म्हणून नियुक्त झालेल्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या जागी दोन नवीन राष्ट्रीय प्रवक्त्यांची घोषणा केली. मंगळवारी सकाळी सीजेपीने ६ नवीन संघटनात्मक महासचिवांच्या नावांची घोषणा केली. सीजेपीकडून रेखा शर्मा, अक्षय शिंदे, प्रेम आकाश, अनम उझ्झामा आणि बालकृष्ण शुल्का यांना या महत्वाच्या पदाची जबाबदारी दिली.

सीजेपीने सुधीर संगवान आणि सिद्धांत भारद्वाज यांची राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली. यापूर्वी सौरभ दास आणि आशुतोष रांका हे या पदावर होते. या दोघांची राष्ट्रीय सह-संयोजक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ही पद रिक्त होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थापनेनंतर सुरूवातीला फक्त ३ प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली. २० जुलैच्या बर्गर प्रकरणानंतर तिसऱ्या प्रवक्त्या विजेता दहिया यांना पदावरून हटवण्यात आले होते.

कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या उत्तर विभाग समन्वय समितीवर अनेक सदस्यांची नियुक्ती केली. या समितीत आदेश प्रधान गुर्जर, आझाद मोहित, मोहम्मद फरहान खान, विश्वेश कर्णवाल, उज्ज्वल पांडे, पूजा सैनी, आफताब सिंग विर्क, अर्शदीप सिंग कोचर, जाहिद अहमद माले, महविश अली, श्रेष्ठ सिंग खेरा, अजय देशवाल, डॉ. विवेक संगवान, मुकेश ऑलराउंड, राम जाखड, हर्ष कार्तिकेय सिंह आणि आरुषी घई यांचा समावेश आहे.

सीजेपीकडून आपल्या कार्यकारणीचा विस्तार अशावेळी करण्यात आला जेव्हा एक दिवस आधी दिल्लीमध्ये एका नवीन आंदोलनाची घोषणा केली. सीजेपी ५ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या इंडिया गेट ते पोलिस मुख्यालयपर्यंत आंदोलन करण्याची घोषणा केली. कॉक्रोच जनता पार्टीने केंद्र सरकारवर दिलेली आश्वासन पूर्ण न करण्याचा आरोप केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT