केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  saam TV
देश विदेश

Chirag Paswan : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Chirag Paswan Threat Letter : पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोस्टाद्वारे धमकीची चिठ्ठी मिळाल्यानंतर पासवान यांच्या कार्यालयानं केंद्रीय गृहसचिवांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे.

Nandkumar Joshi

केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या सुरक्षेसंबंधी चिंता वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोस्टाद्वारे पाठवण्यात आलेल्या पत्रात पासवान यांना धमकी देण्यात आली आहे. या प्रकाराची पासवान यांच्या कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय गृहसचिवांना तात्काळ पत्र लिहून सुरक्षा वाढवण्याची, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, चिराग यांना पाठवण्यात आलेले धमकीचे पत्र ( Chirag Paswan receives death threat letter by post) इंग्रजीत लिहण्यात आले आहे. कट्टर दहशतवाद्यांकडून लवकरच तुमची हत्या करण्यात येणार आहे, असा मजकूर त्यात आहे. या चिठ्ठीनंतर पासवान यांच्या कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवण्यात आले आहे. गृहसचिवांच्या नावाने पत्र लिहून या घटनेची माहिती दिली आहे. चिराग यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. योग्य ती पावले उचलण्यात यावीत, अशी विनंती केली आहे.

चिराग पासवान यांना धमकी (Chirag Paswan threat letter sparks security concerns) मिळाल्यानंतर तपास यंत्रणांनी पत्र कुठून पाठवण्यात आलं? ते पत्र पाठवणारी व्यक्ती कोण? याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पासवान यांना धमकी देणारी व्यक्ती कोण, त्यामागचा हेतू काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन धमकीच्या पत्राशी संबंधित वेगवेगळ्या शक्यतांच्या दिशेने तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

चिराग पासवान यांना झेड सुरक्षा

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना केंद्र सरकारकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यात २२ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच एस्कॉर्ट वाहन, सशस्त्र कमांडो यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. झेड दर्जाची सुरक्षा देशातील निवडक व्यक्तींनाच देण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांचे रिपोर्ट आणि गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे गृहमंत्रालयाकडून संबंधित व्यक्तींना वेगवेगळ्या दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

IND vs SL ODI Fact Check: पहिला वनडे सामना दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार? व्हायरल सत्य

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT