कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात AI मध्ये क्रांती घडवणाऱ्या दिग्गज अमेरिकन टेक कंपनी Nvidia प्रमुखांना मोठा धक्का बसलाय. Nvidia सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे सीईओ जेन्सेन हुआंग चक्क हनीट्रॅपचे शिकार झालेत. 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने या संदर्भातील शोध अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर तंत्रज्ञान जगतात एकच खळबळ उडालीय. या घडामोडींनंतर Nvidiaच्या संचालक मंडळानं संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. द न्युयॉर्क टाईम्सच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात.
हुआंग ली या नावाने ओळखली जाणारी ॲलिस हुआंग चीनची नागरिक
सिंगापूरस्थित मेगास्पीड कंपनीत उच्चपदस्थ कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत
हुनान टीव्ही चॅनलची रिपोर्टर
अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला होता ॲलिस चीनची गुप्तहेर असल्याचा संशय
Nvidiaच्या गोपनीय AI चिप्सची माहिती बीजिंगपर्यंत पोहोचवल्याचा तिच्यावर संशय
विशेष म्हणजे, हा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर जेन्सन हुआंग यांनी प्रेमसंबंधांची कबुली देत कुटुंबीय आणि कंपनीतील सहकाऱ्यांची माफी मागितली.
मी माझे कुटुंब, पत्नी आणि तुम्हा सर्वांची मनःपूर्वक माफी मागतो. मी माझ्या पत्नीची फसवणूक केली असून माझ्या या वागण्यामुळे माझी पत्नी आणि मुलांना प्रचंड मानसिक धक्का बसलाय. मी जे काही केलं त्याचं समर्थन करण्यासाठी माझ्याकडे कुठलंही कारण नाही. मला या गोष्टीचा पश्चात्ताप होतोय. एलिस आता त्या कंपनीत कार्यरत नसून, अमेरिकन प्रशासनानं तिच्याविषयी आपल्याला आधी कुठलीही गुप्त माहिती दिली नव्हती. अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा आणि कंपनीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.