China On New Parliament Building
China On New Parliament Building Saam Tv
देश विदेश

China On New Parliament Building: भारताच्या संसदेच्या नव्या इमारतीचे चीनकडून कौतुक, Global Times मधून पंतप्रधान मोदींबद्दल लिहिलं...

Satish Kengar

China On New Parliament Building: चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र मानले जाणारे चीनी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने (China Newspaper Global Times) भारताच्या नवीन संसद भवनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

ग्लोबल टाइम्समध्ये लिहिण्यात आलं आहे की, भारत वसाहती काळातील सर्व चिन्हे पुसून टाकत आहे. वृत्तपत्राने आपल्या एका संपादकीयात म्हटले आहे की, चीन भारताची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याच्या इच्छेने उभा आहे.

वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे की, ''भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. ब्रिटिश वसाहत काळात जवळपास शतकापूर्वी बांधण्यात आलेल्या जुन्या संसदेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे. नवीन संसद भवन हा मोदी सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा मुख्य भाग मानला जातो. भारताची राजधानी गुलामगिरीतून मुक्त करणे हा त्याचा उद्देश आहे.'' (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा संदर्भ देत वृत्तपत्राने लिहिले की, नवीन संसद ही केवळ एक इमारत नाही आणि ती स्वावलंबी भारताच्या उदयाची साक्ष देईल.

नवीन संसद भवनाच्या वैशिष्ट्यांचा संदर्भ देत वृत्तपत्राने लिहिले की, 'या इमारतीची किंमत सुमारे 12 कोटी डॉलर्स आहे. त्यात मोर, कमळाचे फूल आणि वटवृक्ष यासारख्या राष्ट्रीय चिन्हांचा समावेश आहे. ही चिन्हे भारताच्या इतिहासाची आणि संस्कृतीची वैशिष्ट्ये दर्शवतात.

वृत्तपत्र पुढे लिहिलं आहे की, ''1968 मध्ये भारत सरकारने नवी दिल्लीतील इंडिया गेटसमोरील किंग जॉर्जचा पुतळा हटवला. त्यानंतर 8 सप्टेंबर 2022 रोजी मोदी सरकारने राणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूच्या दिवशी इंडिया गेटसमोरील राजपथाचे नाव 'कर्तव्यपथ' असे केले.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

SCROLL FOR NEXT