FC- 31 Fighter jet x
देश विदेश

भारताविरोधात पाक-चीनी भाईभाई! पाकच्या सुरक्षेसाठी चीनी विमानं?

Operation Sindoor मध्ये भारतानं चिनी बनावटीच्या शस्त्रास्त्रांना उद्धव करून टाकलं. तरीही पाकला अजून चिनी बनावटीच्या शस्त्रांवर अवलंबून आहे. चीननं पाकिस्तानला दिलेलं FC- 31 फायटर जेट भारतापुढे टिकाव धरू शकणार आहे का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

Vaishnavi Raut

ऑपरेशन सिंदूरनं पाकची दाणादाण उडवली.. त्यात पाकिस्तानने डागलेली चायना बनावटीची एक ना अनेक शस्त्रं भारतानं क्षणात बेचिराख केली.. तरीही चीन आणि पाकिस्तानची अक्कल अजूनही ठिकाणावर यायचं नाव घेत नाही... आता चीननं पुन्हा एक नवं फायटर जेट पाकिस्तानला दिलंय...त्याचं नाव आहे- FC-31 स्टेल्थ फायटर जेट म्हणजेच FC-31 जायरोफाल्कन.. पण खरंच हा चायना माल किती घातक आहे? सविस्तर पाहूयात...

कसं आहे हे FC-31 स्टेल्थ फायटर जेट?

- FC-31 हा चीनी बनावटीच्या पाचव्या पिढीचा स्टेल्थ फायटर जेट

- चीनच्या शेनयांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनकडून फायटर जेटची निर्मिती

- अमेरिकेच्या F-35 शी स्पर्धा करणार

- जेटचा वेग 2,200 किमी प्रति तास

- 1,200 किमीपर्यंत शस्त्रं डागण्याची क्षमता

- रडारला चकवा देणाऱ्या PL-17 मिसाइलनं सज्ज

- 10,000 किलोग्रॅम वजनाची शस्त्रं वाहून नेण्यास सक्षम

- 500 किलोग्रॅमचे 8 किंवा 30 छोटे बॉम्ब ठेवता येणार

चीनने एवढं कौतूक केलेलं हे FC-31 स्टेल्थ फायटर जेट पाकिस्ताच्या हवाई दलात सामील होणार आहे...ते चालवण्याचं प्रशिक्षणही पाकिस्तानी हवाई दलाचे पायलट आणि तंत्रज्ञ चीनमध्ये घेतायत. पाकिस्तान एकूण 30 ते 36 FC-31 जेट खरेदी करणार आहे.. एवढंच नाही तर ते पुढील 12-18 महिन्यांत पाकिस्तानच्या हवाई दलात दाखल होणार आहे... मात्र चीनी बनावटीच्या या फुसक्या मालाचा भारताला किती फटका बसू शकतो? पाहूयात....

FC-31 चा भारताला धोका किती?

FC- 31 सोबत लढण्यासाठी 42 हवाई तुकड्यांची गरज

भारतीय बनावटीचं स्टेल्थ जेट AMCA येण्यास 2035 पर्यंत वेळ लागणार

PL-17 मिसाइल भारताच्या रडारला चकवा देऊन हल्ला करण्याची क्षमता

हे असं असलं तरी भारत रशियासोबत हवाई संरक्षण यंत्रणा एस 500 च्या निर्मितीची रणनीती आखत आहे.... त्यामुळे ड्रॅगनने पाकिस्तानला मदत करुन भारताविरोधात कुरापती केल्या.. तरी त्यांच्या नांग्या ठेचण्याची तयारी भारतामध्ये आहे... .. एवढंच नाही तर आता भारतानं राफेलची निर्मिती आणि ओव्हर द हॉरिझॉन हवाई संरक्षण सिस्टीमसाठी रशियाला ऑर्डर दिलीय.. त्यामुळे पाकनं चायना माल विकत घेतला असला तरी भारत काही कच्चा खेळाडू नाही.. त्यामुळे पाक आणि चीनने लक्षात ठेवावं की बाप तो बाप रहेगा....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

Haldi Kunku Gift Idea : बेस्ट हळदी–कुंक वाण आयडिया, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या खास वस्तू

Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...

Maharashtra Live News Update: नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

SCROLL FOR NEXT