Corona Virus Saam Tv
देश विदेश

Corona Updates : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक! अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. मागील काही महिन्यांपासून कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

बीजिंग : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. मागील काही महिन्यांपासून कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, तब्बल सहा महिन्यानंतर चीनमध्ये कोरोनाचा (Corona) पहिला मृत्यू झाला असून अनेकजण व्हेंटिलेटरवर आहे. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन केले आहे. तसेच, जास्तीत जास्त टेस्टिंग आणि क्वारंटाइनवरही भर दिला जात आहे.

चीनच्या (China) बीजिंग शहरात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी बीजिंगमध्ये कोरोनाचे तब्बल ९६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवारी बीजिंगमधील ६२१ लोकांना कोरोनाची लागण झाली होती. हीच बाब लक्षात घेता चिनी सरकारने बीजिंगमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

इतकंच नाही तर, कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बीजिंगमधील अनेक जिल्ह्यांतील शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ऑनलाईन धडे दिले जावे, असा आदेश चिनी सरकारने दिला आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी चीन सरकारने लोकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यापासून रोखले आहे.

सरकारी आदेशानुसार, रविवारी बीजिंगमधील अनेक शॉपिंग मॉल्स बंद ठेवण्यात आले होते, तर अनेक मॉल्स उघडण्याचे वेळेत बदल केले आहेत. याशिवाय, अनेक रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करण्याची सुविधाही रद्द करण्यात आली आहे. चाओयांग जिल्हा अधिकार्‍यांनी येथील कंपन्यांना आपल्या कर्मचार्‍यांसाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. काही उद्याने आणि जिमही पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT