Corona Vaccine Saam TV
देश विदेश

Vaccination: 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना या तारखेपासून कोरोनाची लस मिळणार

12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण 16 मार्चपासून सुरू होणार आहे.

साम वृत्तसंथा

12 ते 14 वयोगटातील मुलांना 16 मार्चपासून कोरोनावरील (Corona) लस (vaccine) मिळणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनापासून संरक्षणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट (Tweet) करून ही माहिती दिली आहे.

12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण 16 मार्चपासून सुरू होणार आहे. मुलं सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे, असं ट्विट मध्ये त्यांनी म्हटलं आहे. 16 मार्चपासून 12 ते 13 आणि 13 ते 14 वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण सुरू होत आहे. सर्वांनी लस घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली ट्विट मध्ये केली आहे.

देशात कोरोनावरील (corona) लसीकरण गतीने सुरु झाले आहे. मुंबईत दोन्ही डोसचे 100 टक्के लसीकरण (Vaccine) पूर्ण झाले आहे. देशातील 15 ते 18 वयोगटातील तीन कोटींहून अधिक किशोरवयीन मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे (Corona)2,503 नवे रुग्ण आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांमध्ये 19.6 टक्के घट झाली आहे. आतापर्यंत कोरोनाचे एकूण 42,993,494 रुग्ण आढळले आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT