A 9-year-old girl from Rajasthan died after a sudden heart attack at school — raising alarms over children’s growing vulnerability to lifestyle-related cardiac issues. Saam tv
देश विदेश

Child Heart Attack: ९ वर्षांच्या मुलीचा शाळेत हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लहानग्यांमध्ये वाढतंय हार्ट अटॅकचं प्रमाण

Heart Attacks Among Kids on the Rise: लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललयं. त्यातच 9 वर्षाच्या मुलीचा हार्ट अटॅकनं शाळेत दुर्देवी मृत्यू झालाय... 9 वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक कसा आला? हार्ट अटॅक मागे नेमकं कारण काय?

Suprim Maskar

ती हसत हसत शाळेत गेली... मात्र पुन्हा परतलीच नाही...

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील आदर्श विद्या मंदिर शाळेत 9 वर्षीय चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. दुपारी जेवणासाठी तिने टिफीन उघडला... आणि त्याचवेळी ती अचानक खाली कोसळली.. उपचारासाठी नेत असताना तिला पुन्हा झटका आला आणि तिचा दुर्देवी मृत्यू झाला..

लहान मुलांचा हदयविकारानं मृत्यु होण्याचं ही काही पहिलीच घटना नाही.. 6 महिन्यांपूर्वी बंगळुरुमध्ये एका शाळेत अशीच घटना घडली होती आठ वर्षांची मुलगी बराच वेळ शाळेच्या आवारात उभी होती. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटल्यानं ती खुर्चीवर बसली.आणि तिथेच तिचा मृत्यु झाला..

लहान मुलांनाही हार्टअटॅकचा धोका का?

जन्मतःच हृदयात दोष मात्र वेळेवर निदान न झाल्यास गंभीर धोका

स्क्रीन टाईम जास्त आणि त्यामुळे शारीरिक हालचाली नाही

संतुलित आहाराकडे दुर्लक्ष. जंक फूड, सॉफ्ट ड्रिंकमुळे विपरित परिणाम

स्पर्धा, अभ्यास, पालकांची अपेक्षा यामुळे तणाव

धाप लागणे, थकवा जाणवणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष

ह्दयविकाराच्या झटक्यानं कमी वयातच चिमुकल्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत चाललंय. मात्र आनुवंशिकता, बदलती जीवनशैली, फास्ट फुडचं अतिसेवन, आरोग्याच्या आधीपासूनच्या समस्या अशी अनेक कारणं हार्ट अटॅकमागे असू शकतात..त्यामुळे पालकांनीच जबाबदारीचं भान राखून मुलांना नियमित व्यायाम आणि वागणुकीबाबत काही नियम घालून दिले तर याचं प्रमाण निश्चितच रोखता येईलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

SCROLL FOR NEXT