Breaking: लष्करी हेलिकॉप्टरचा अपघात; बिपिन रावत गंभीर, मृत्यांचा आकडा वाढला Saam Tv
देश विदेश

Breaking: लष्करी हेलिकॉप्टरचा अपघात; बिपिन रावत गंभीर, मृत्यांचा आकडा वाढला

तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था- भारताचे सीडीएस बिपिन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होती अशी माहिती समजली आहे. तिघांना वाचवण्यात यश आले आहे. हेलिकॉप्टरमध्ये वरिष्ठ अधिकारी होते असंही सांगण्यात येत आहे. तामिळनाडू मधील कुन्नूर परिसरात लष्कराचे हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. एकूण 14 जण त्यात होते. लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही त्यात समावेश होता अशी माहिती आहे. हेलिकॉप्टर एकूण 14 जण प्रवास करत होते. 4 जण अतिगंभीर, 3 गंभीर तर 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बिपिन रावत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

पहा व्हिडिओ-

लष्कराचं हेलिकॉप्टर कून्नूर इथं क्रॅश झालं आहे. बिपिन रावत हे हेलिकॉप्टरमध्ये होते, त्याचबरोबर त्यांच्या पत्नीही सोबत होत्या. त्यांनाही क्रिटीकल इंज्यूरी असल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. भारताचे पहिले आणि वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. त्यांनी 1 जानेवारी 2020 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे पद स्वीकारले होते. याआधी ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. रावत यांनी 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात

केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

Dussehra Horoscope: दसऱ्याला 3 राशींचं नशीब चमकणार! अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत, पैशाच्या समस्या दूर होणार

SCROLL FOR NEXT