Naxal News : मोठी बातमी! १९ नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटींचं बक्षीस असणाऱ्यालाही टिपलं. (File Photo) Saamtv
देश विदेश

Naxal Encounter : मोठी बातमी! १९ नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटीचं बक्षीस असणाऱ्यालाही टिपलं

Chhattisgarh Naxal Encounter : मृत १९ नक्षलवाद्यांमध्ये मनोज आणि गुड्डू या दोन जहाल नक्षलवाद्यांचा समावेश आहे. मनोज याच्यावर एक कोटी तर गुड्डू याच्यावर २५ लाख रूपयांचं बक्षीस सरकारने ठेवले होतं.

Namdeo Kumbhar

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये सोमवारी नक्षलवादी आणि जवान यांच्यामध्ये चकमक झाली. यामध्ये १९ नक्षलवादी मारले गेले आहे. सोमवारी सुरू झालेले सर्च ऑपरेशन अद्याप सुरूच आहे. आणखी काही नक्षलवाद्याचे मृतदेह मिळण्याची शक्यता आहे. नक्षलवादी लपून आणि वेळ घेऊन हल्ला करत आहेत, त्यामुळे जवानांना सर्च ऑपरेशन करण्यास वेळ लागत आहे. मृत १९ नक्षलवाद्यांमध्ये मनोज आणि गुड्डू या दोन जहाल नक्षलवाद्यांचा समावेश आहे. मनोज याच्यावर एक कोटी तर गुड्डू याच्यावर २५ लाख रूपयांचं बक्षीस सरकारने ठेवले होतं.

सोमवारी सायंकाळी जवानांनी मैनपूर येथील कुल्हाडी घाटाच्या भालू डिग्गी जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. त्यावंतर जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये अनेकजणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळालेत. मृत झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये सेंट्रल कमेटीचा सदस्य मनोज आणि स्पेशल झोनल कमेटीचा सदस्य गुड्डू यांचा समावेश आहे. दोघांमध्ये सव्वा कोटींचं बक्षीस ठेवण्यात आलेय. मनोज ओडिशा राज्य नक्षलग्रस्तांचा प्रमुखही आहे.

एक कोटी इनाम असणाऱ्या नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमेटीचा सदस्य जयराम उर्फ चलपती यालाही पोलिसांनी ढेर केलेय. मृत झालेल्या नक्षलावद्यांमध्ये महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे, त्यांची ओळख पटवली जात आहे. नक्षलवाद्यांकडून एसएलआर रायफल आणि ऑटोमेटिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे. मोहीम फत्ते झाल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.

सोमवारी झालेल्या चकमकीनंतर सर्च ऑपरेशनसाठी E30, कोबरा 207, सीआरपीएफ 65 आणि 211 बटालियन, एसओजी नुआपाडा यांचे संयुक्त पथक रवाना झाले. आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. आजही सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे. सर्च ऑपरेशन संपल्यानंतर कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: फेब्रुवारीपासून चमकणार या ३ राशींचं नशीब; 29 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

SCROLL FOR NEXT