Prasanna Shankar Wife Divya Shashidhar Allegations Saam Tv News
देश विदेश

Prasanna Shankar : प्रसन्न विकृत माणूस, तो बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावून...; आरोप करणाऱ्या पतीवर बायकोचा पलटवार

Prasanna Shankar Wife Divya Allegations : मी एक्सएल साईजचे कंडोम मागवल्याचा आरोप करणारा माझा नवराच विकृत आहे, तो महिलांचे छुपे व्हिडिओ काढतो, असा पलटवार प्रसन्न शंकर यांची पत्नी दिव्याने केला आहे.

Prashant Patil

बंगळूरु : भारतीय वंशाचे अब्जाधीश उद्योगपती आणि रिपलिंगचे कंपनीचे संस्थापक प्रसन्न शंकर सध्या त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. १० अब्ज डॉलर्सच्या कंपनीचे मालक असलेले प्रसन्न शंकर यांना पत्नीकडून धोका मिळालाय. त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत आणि मुलाला जबरदत्तीने अमेरिकेत नेलं असल्याचंही प्रसन्न शंकर यांनी म्हटलंय. यानंतर त्यांच्या पत्नीनेही आपली बाजू मांडली आहे. मला काहीच कल्पना नाही की काय सुरु आहे. मी खूप घाबरले आहे. मला काय करावं हे समजत नाही, असं दिव्याने म्हटलं आहे.

मी अमेरिकन दूतावासात गेले. त्यानंतर चेन्नई पोलिसही माझ्या मुलाला शोधण्यात मदत करत आहेत. असं दिव्याने सांगितलं. मी एक्सएल साईजचे कंडोम मागवल्याचा आरोप करणारा माझा नवराच विकृत आहे, तो महिलांचे छुपे व्हिडिओ काढतो, असा पलटवार दिव्याने केला आहे.

दिव्याने प्रसन्न हे विकृत्त प्रवृत्तीचा माणूस असल्याचा आरोप केला आहे. तो महिलांचे गुपचूप व्हिडिओ बनवत होता. त्याने बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले आणि महिलांचे व्हिडिओ काढले. त्याने लैंगिक अत्याचारही केले. मी सुद्धा याचा बळी ठरली आहे. सिंगापूर पोलिसांनी त्याला या गुन्ह्यांसाठी अटक केली होती, पण तो जामिनावर सुटला, असं दिव्या म्हणाली. इतकंच नाही, तर अनेक वर्षांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याला वेश्या व्यवसाय करताना अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याची नोकरीही गेली, असा आरोपही तिने केलाय.

दिव्याने पुढे म्हणाली की, प्रसन्नच नाही, तर त्याचे वडिलही अनेक लैंगिक गुन्ह्यांमध्ये सहभागी होते. त्याच्या वडिलांनी अनेक लैंगिक गुन्हे केले, आपल्या पत्नीला मारहाण केली आणि तिला घराबाहेर काढले, असा आरोप दिव्याने केला. मला न्याय हवा आहे. माझा मुलगा कुठे आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे, अशी मागणी दिव्याने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

SCROLL FOR NEXT