Cyclone Michaung ANI
देश विदेश

Chennai Cyclone Michaung: चक्रीवादळामुळे चेन्नईत ५ जणांचा मृत्यू; उद्या तेलंगणासाठी रेड अलर्ट

Cyclone Michaung: आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आज रेड अलर्ट देण्यात आला होता. उद्या ५ डिसेंबरला तेलंगणासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

Bharat Jadhav

Chennai Cyclone Michaung:

चेन्नईमधील चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे झाडे कोसळली असून अनेक ठिकाणी विद्युत अपघातांचे प्रकार घडले आहेत. यात ५ जणांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालीय.

बंगालच्या उपसागरात २ डिसेंबर रोजी आलेले मिचॉन्ग चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकलं. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आज रेड अलर्ट देण्यात आला होता. उद्या ५ डिसेंबरला तेलंगणासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

चक्रीवादळामुळे चेन्नईत मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचल्याने धावपट्टी बंद करण्यात आलीय. वादळामुळे तामिळनाडूतील महाबलीपुरम बीचवर समुद्राची पातळी सुमारे ५ फुटांनी वाढलीय.

तामिळनाडूच्या पाणीपुरवठा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, चेन्नई शहरात ७०-८० वर्षांत पहिल्यांदाच असा पाऊस झालाय. चेन्नईमध्ये रविवारपासून पाऊस सुरू झाला होता. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १२ सेमी पावसाची नोंद झाली आहे. काही भागात २० ते २२ सेंटीमीटर पाऊस झाला.

दरम्यान या वादळाला म्यानमारने मिचॉन्ग हे नाव दिलं आहे. याचा अर्थ सामर्थ्य आणि लवचिकता असं होतं. मिचॉन्ग चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे चौथे आणि हिंदी महासागरातील २०२३ या वर्षामधील सहावे वादळ आहे. अत्यावश्यक सेवा वगळता तामिळनाडूमध्ये सोमवार आणि मंगळवारी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलीय.

NDRF च्या ९ टीम आणि SDRF च्या १४ टीम इथे तयार झाल्यात. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवर पाणी साचल्यामुळे त्या बंद करण्यात आल्या आहेत. सोमवारी सकाळी ९.४० ते रात्री ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले. या विमानतळावर होणारी ७० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बाहेरून येणारी उड्डाणे बेंगळुरूकडे वळवली जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT