Petrol Diesel Price Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल महागलं; तुमच्या शहरातील इंधनाचा दर काय?

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Rates: आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. WTI क्रूड 0.42 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 77.39 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.28 टक्क्यांच्या वाढीसह 81 डॉलरवर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. (Latest Marathi news)

हिमाचल प्रदेशात आज पेट्रोल (Petrol) 88 पैशांनी स्वस्त होऊन 95.07 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. येथे डिझेल 78 पैशांनी कमी होऊन 84.38 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. मध्य प्रदेशात पेट्रोल 38 पैशांनी तर डिझेल 36 पैशांनी स्वस्त झालं आहे. पंजाबमध्ये 28 पैशांनी, राजस्थानमध्ये 34 पैशांनी आणि महाराष्ट्रात (Maharashtra) 24 पैशांनी पेट्रोल महागलं आहे. तर या राज्यांमध्ये डिझेल (Diesel) अनुक्रमे 27 पैसे, 31 पैसे आणि 25 पैशांनी महागले आहे. चेन्नईत पेट्रोल-डिझेल थोडे स्वस्त झाले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT