Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price : वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' राज्यात पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत मोठा बदल

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel Price : जागतिक बाजारात गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल सुमारे तीन डॉलरने घसरल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये किरकोळ बदल दिसून येत आहे. आज बिहारची राजधानी पाटणामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून यूपीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. (Petrol Diesel Price Today)

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरांनुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोलची किंमत 96.60 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 89.77 रुपये प्रति लिटर आहे. गाझियाबादमध्येही पेट्रोल 96.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.45 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मात्र, बिहारची राजधानी पटनामध्ये आज पेट्रोल 50 पैशांनी 108.12 रुपये आणि डिझेल 47 पैशांनी 94.86 रुपये प्रति लिटर महागले आहे.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT