Mayawati Press Conference saam tv
देश विदेश

मायावतींच्या पत्रकार परिषदेत गोंधळ; शॉर्ट सर्किट, बोर्डातून ठिणग्या, संपूर्ण हॉलमध्ये धुराचे लोट

Mayawati Press Conference Short Circuit : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बसप प्रमुख मायावतींच्या पत्रकार परिषदेत गोंधळ उडाला. हॉलमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं. अखेर मायावतींना कडेकोट सुरक्षेत हॉलमधून बाहेर काढण्यात आले.

Nandkumar Joshi

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या वाढदिवशी मोठा अनर्थ टळला. मायावतींची पत्रकार परिषद सुरू असतानाच सभागृहात अचानक शॉर्ट सर्किट झालं. विजेच्या बोर्डातून ठिणग्या उडायला लागल्या. काही क्षणांतच अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. संपूर्ण हॉल धुराने काळवंडला होता. मायावतींची पत्रकार परिषद संपत असतानाच ही घटना घडली. परिषदेतील नेते आणि वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांमध्ये गोंधळ उडाला.

अनर्थ टळला

पत्रकार परिषदेत शॉर्ट सर्किट झाल्यानंतर विजेच्या बोर्डातून ठिणग्या उडू लागल्या. सभागृहात सर्वत्र धूर झाला. मायावतींच्या सुरक्षाव्यवस्थेत तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर त्यांना निवासस्थानी आणण्यात आले. याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथक आणि वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. वेळ न दवडता अग्निशामक उपकरणांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेने काही वेळ सभागृहात प्रचंड गोंधळ झाला.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बसप प्रमुख मायावतींच्या पत्रकार परिषदेत उडालेल्या गोंधळामुळं सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. जन्मदिनी पत्रकार परिषदेचे आयोजन आणि माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी झालेली असताना शॉर्ट सर्किटची घटना घडल्याने सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असून, तांत्रिक पथक या घटनेमागील कारणांचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यातील पेठाही आता FDA च्या रडारावर, अनेक मिठाईच्या दुकानावर छापा; ५ हॉटेलचे परवाने रद्द

Maharashtra News Live Update: आंदोलक विद्यार्थ्यांवर देशाला गर्व आहे - राहुल गांधी

Political News :"राहुल गांधी हे २४ तास ड्रग्सच्या नशेत असतात" भाजप आमदारावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Pune Dogs: पुणे पालिकेचा गजब कारभार! भटक्या कुत्र्यांची होणार गणना; 25 लाखांचा खर्च करणार

कुर्ती, ड्रेस आणि साड्यांवर सुंदर दिसतील शॉर्ट मंगळसूत्र, लेटेस्ट, ट्रेंडी 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT